९० गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात घरफोड्याला निगडी पोलिसांनी केली अटक; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

९० गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात घरफोड्याला निगडी पोलिसांनी केली अटक; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त…

पिंपरी चिंचवड (प्रतिक भोसले) – निगडी पोलिसांनी ९० गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात घरफोड्यास आणि एका सोनारास निगडी पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक करून दुकान फोडीचा गुन्हा उघड करून २५ लाखांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. अटक केलेल्या गुन्हेगारावर दरोडा, जबरी चोरी, खुन, खुनाचा प्रयत्न असे ९० गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीकडून निगडी परिसरातील सोन्याचे दुकान फोडल्याचा गुन्ह्यसह तीन गुन्हे उघडकीस आणून सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने असा एकूण २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या धोनोरी येथील सराफ व्यावसायिकाला अटक केली आहे. या प्रकरणी निगडी पोलीस ठाणे येथे गुरनं, २७२/२०२४ भादवि कलम-४५४,४५७,३८०,४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.





या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.२४मे) रोजी रात्रौ ०९/३० वा.सू. ते (दि.२५मे) रोजी सकाळी ०८/३० वा. दरम्यान निगडी प्राधिकरण येथील श्रीलक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकानाचे शटर उचकटुन त्यातील तिजोरी फोडुन त्यामधील सुमारे ३० तोळे सोन्याचे दागीने, १० किलो चांदी, रोख रक्कम १८,०००/- हजार रुपये व तेथील डिव्हीआर चोरुन नेलेबाबत निगडी पोलीस ठाणे येथे गुरनं, २७२/२०२४ भादवि कलम-४५४,४५७,३८०,४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशा प्रकारे गुन्हा करुन सदर आरोपींनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केल्याने सदर बाबत पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, विनयकुमार चौबे यांनी सदर घटनेबाबत कसुन तपास करण्याच्या सुचना दिल्या होत्या.



त्या अनुषंगाने पोलिस उपायुक्त परिंमडळ-१ पिंपरी चिंचवड
स्वप्ना गोरे  यांचे मार्गदर्शनाखाली निगडी पोलीस ठाणेचे वपोनि शत्रुघ्न माळी व पोनि (गुन्हे) तेजस्विनी कदम यांचे नेतृत्वाखाली, तपास पथकातील सपोनि अंबरिष देशमुख व अंमलदार यांनी घटनास्थळावरील व आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषणावरुन सदर गुन्हयात आरोपींनी एक लाल रंगाची श्रेवोलेट एंजॉय गाडी वापरलेचे निष्पन्न करुन पिंपरी चिंचवड व पुणे शहर परिसरातील सरकारी व खाजगी असे एकुण २५० ते ३०० सीसीटीव्ही तपासुन सदर गाडी ही गुन्हा केले नंतर हडपसर भागात गेल्याचे निष्पन्न केले. तेव्हा हडपसर परिसरातील बातमीदारांकडुन माहिती काढता रेकॉर्ड वरील कुख्यात आरोपी  विकीसींग जालिंदरसिंग कल्याणी रा.रामटेकडी हडपसर यास गुन्हयात वापरलेल्या वाहनासह ३ ते ४ दिवसांपुर्वी पाहण्यात आले होते. असे कळाले, त्या अनुषंगाने तपास केला असता सदरच्या आरोपीवर यापुर्वी दरोडा, घरफोडी, जबरी चोरी, खुन, खुनाचा प्रयत्न इत्यादि गंभीर ९० गुन्हे दाखल असल्याचे तसेच तो नेहमी पत्ते बदलुन राहत असल्याची माहिती मिळाली. सदर आरोपी हा नेहमी शस्त्र वापरत असल्याने व यापुर्वी पोलीसांवर फायरींग केली गेल्याची माहिती मिळाल्याने त्यास पकडने आव्हानात्मक होते. त्या अनुषंगाने निगडी पोलीस ठाणे तपास पथकाने सलग ३ दिवस रामटेकडी हडपसर भागात वॉच ठेवुन (दि.३०मे) रोजी रात्री तो त्याचे रामटेकडी परीसरातील घरी येण्याची माहिती मिळाल्याने अतिरीक्त कुमक मागवुन निगडी तपास पथकातील सपोनी देशमुख व अंमलदार, पिंपरी पोलिस ठाणेतील सपोनि अतिग्रे, पोउनि रायकर व अंमलदार यांनी रात्रौ ०१/०० वा दरम्यान त्याच्या घरास वेढा घालुन व बळाचा वापर करुन त्याचे घरात घुसुन आरोपी नामे विकिसिंग जालिंदरसिंग कल्याणी (वय ३५ वर्षे) रा.साईबाबा मंदीराजवळ सर्व्हे नं.११० रामटेकडी हडपसर पुणे यास अटक केली. सदर आरोपीची पोलिस कोठडी घेऊन त्याचेकडे कौशल्यपुर्वक तपास करता, त्याने त्याचे तीन साथीदारासह निगडी पोलिस ठाणे येथील ज्वेलरी शॉप फोडल्याचा, बिबवेवाडी पोलिस ठाणे हद्दित एक बंद फ्लॅट फोडल्याचा, डोंबीवली पोलिस ठाणे हद्दीतील एक चारचाकी वाहन चोरल्याचा असे एकुण ३ गुन्हे केल्याचे निष्पन्न केले. सदर आरोपी याने निगडी पोलिस ठाणे येथील गुन्हयातील आरोपीच्या वाटयास आलेले चांदी व सोने दागिने हे सोनार अब्दुल्ला ताहीरबक्ष शेख (वय ५८ वर्षे) धंदा ज्वेलर्स रा.फ्लॅट क्र.७१७, पनामापार्क सोसायटी, पोरवाल रोड, धानोरी लोहगाव पुणे यास विकल्याचे निष्पन्न झाल्याने सदर सोनारास अटक करुन त्याचेकडुन १०० ग्रॅम सोन्याची लगड, ८ किलो ३०० ग्रम वजनाची चांदीची विट, गुन्हयात वापरलेले श्रेवोलेट एंजॉय गाडी, घरफोडीचे सहित्य व दोन तलवार असा एकुण २५,००,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा आणखी तपास सुरु आहे.



अशा प्रकारे सदरची कामगिरी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे,अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपआयुक्त परि. १ स्वप्ना गोरे, सहायक पोलिस आयुक्त चिंचवड विभाग, राजु मोरे यांचे मार्गदर्शनाखाली शत्रुघ्न माळी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक तेजस्वीनी कदम पोलिस निरीक्षक (गुन्हे), अंबरिष देशमुख, सहा.पोलिस निरीक्षक अतिंग्रे सहा.पोलिस निरीक्षक, रायकर पोलिस उपनिरीक्षक, दोन्ही पिंपरी पोलिस ठाणे, निगडी पोलिस ठाणेकडील तपास पथकातील भगवान नागरगोजे, सुधाकर अवताडे, सिद्राम बाबा, भुपेंद्र चौधरी, राहुल गायकवाड, विनोद होनमाने, दत्तात्रय शिंदे, तुषार गेंगजे, विनायक मराठे, सुनिल पवार, केशव चेपटे, प्रविण बांबळे, कविता वावरे, स्नेहा म्हस्के, तसेच पिंपरी पोलीस ठाणे तपास पथकातील राजेंद्र बारशिंगे, शांताराम हांडे, विजय जानराव, समीर ढवळे, गणेश काकड, दिनेश पुंडे, सचिन आचार्य, दत्ता कवठेकर, तांत्रीक विश्लेषक नुतन कोंडे, सीसीटीव्ही कंट्रोलरुम येथील स्वप्नाली म्हसकर, सारीका अंकुश यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!