उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेने प्रतिबंधित असलेल्या गुटखा विक्री करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

उस्मानाबाद(प्रतिक भोसले)-  सविस्तर व्रुत्त असे की स्थानिक गुन्हे शाखेला  दि.02.09.2023 रोजी गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा जि. उस्मानाबाद च्या
पथकाने महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला गुटखा असा एकुण 5,36,000 ₹ किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर प्रकरणी सविस्तर माहिती अशी की, दिनांक 02.09.2023 रोजी 22.10 स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यशवंत जाधव यांना
अंबेजवळगा येथील माळवस्ती मध्ये तीन इसम महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ सुगंधीत सुपारी व गोवा गुटख्याच्या पुड्या अवैध्य विक्री करत आहे, अशी गोपनिय बातमी मिळाली त्या बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लागलीच सदर ठिकाणी जाउन छापा कारवाई केली असता. नमुद इसम

1) आबासाहेब बाबुशा ननवरे,





2) विशाल हनुमंत पवार,



3)किरण उर्फ कृष्णा जाधव



सर्व रा.. अंबेजवळगा, ता. जि. उस्मानाबाद हे तिघे पोलिसांची चाहुल लागताच पळून गेले. तसेच पथकाने आबासाहेब नन्वरे यांचे शेतात पत्राचे शेडमधे  जावून पाहणी केली. त्यामध्ये एकुण पोते क्र 1 ते 31
मध्ये हिरा पान मसालाचे पाऊच मिळून आले प्रत्येक पोत्यामध्ये 100 पाऊच, असे एकुण 3100 पाऊच, पोते क्र 32 ते 37 मध्ये पाहणी करता आतमध्ये गुटख्याचे 420 पाऊच सह एक होन्डां शाईन मोटरसायकल असा एकुण 5,36,000 ₹ किंमतीचा सुगंधीत पान मसाला, गुटखा साठवण करुन सदरचा गुटखा विक्री करण्यासाठी पत्राचे  शेड मध्ये ठेवलेला मिळून आला. त्याचा
सविस्तर पंचनामा करुन माल जप्त करुन ताब्यात घेउन गुटखा विक्री करणारे इसम  1) आबासाहेब ननवरे, 2) विशाल हनुमंत पवार, 3) किरण उर्फ कृष्णा जाधव रा. अंबेजवळगा, ता. जि. उस्मानाबाद याचेविरुध्द दि.03.09.2023 रोजी उस्मानाबाद ग्रामीण पो. ठा. येथे गुरंन 265/2023, भा.दं.वि. सं. कलम- 328, 272, 273, 188 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
सदरची कामगीरी ही  पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर्
पोलिस  अधीक्षक  नवनित कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी यशवंत जाधव, सपोनि  मनोज निलंगेकर, पोलिस हवलदार/हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, बबन जाधवर, बलदेव ठाकुर, चालक पोलिस हवलदार मस्के यांच्या पथकाने केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!