भांडणात गावठी बनावटीचे पिस्टल काढुन फायर करणार्याच्या परभणी पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

परभणी : सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 03/10/2023 रोजी पाथरी रोड वरील हॉटेल सिंडीकेट येथे भांडण झाले असून त्यात
आरोपीने पिस्टल काढून फायर करण्याचा प्रयत्न केला परंतू फायर झाला नाही. सदर घटनेवरून पोलिस ठाणे नानलपेठ येथे गु.र.नं. 403/2023 कलम 307, 143, 147, 149 भा.दं.वि. सह कलम 3,
25 भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची माहिती मिळाल्याने.पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांनी पोलिस निरीक्षक स्था.गु.शा. यांना माहिती काढून आरोपी शोधणे व गुन्हा निष्पन्न करणे बाबत आदेश व सुचना दिल्या. त्यावरून स्था.गु.शा. परभाणी चे पथक नेमून माहिती घेत असतांना खात्रीशीर गोपनिय माहिती मिळाली की, शेर खान समंदर खान पठाण, रा. खंडोबा बाजार, परभणी याने व त्याच्या मित्रानी हॉटेल सिंडीकेट, पाथरी रोड परभणी येथे त्याचे मित्रासोबत जाऊन भांडण केल्याची गोपनिय माहिती मिळाल्यावरून तांत्रीक माहितीच्या आधारे सापळा रचून मोठ्या शिताफीने सदर आरोपीस ताब्यात घेतले असता आरोपी शेर खान समंदर खान पठाण, वय 21 वर्षे, रा. खंडोबा बाजार, परभणी याने त्याचे मित्रांसोबत सदर हॉटेल मध्ये जेवण करण्यासाठी गेले असता फिर्यादी व आरोपीचा मित्र यांचा वाद झाला. त्यामध्ये आरोपीने त्याचेकडील गावठी कट्टा काढून जमीनीत फायर करण्याचा प्रयत्न केला परंतू फायर झाला नसल्याचे सांगत असल्याने त्यास पुढील तपास कामी पोलिस स्टेशन नानलपेठ येथे हजर करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. , अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली  व्ही. डी. चव्हाण पोलिस निरीक्षक, पोउपनि अजित बिरादार, गोपिनाथ वाघमारे, बालासाहेब तुपसुंदरे, रविकुमार जाधव, आशा सावंत, दिलावर पठाण, दिलीप निकाळजे, शेख रफियोद्दीन, निलेश परसोडे, मधूकर ढवळे, सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा परभणी व सायबर सेल चे गणेश कौटकर यांनी मिळून केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!