
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक.…..
परभणी (प्रतिनिधी) – जिंतूर ते औंढा रोडवर दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मोठ्या शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. त्यांच्या कडून दरोडा टाकण्याचे आयुध (हत्यार) तलवार, खंजीर, टामी, दोऱ्या व मीरची पूड व दोन मोटारसायकल असे गाड्या आडवून दरोडा टाकण्याचे साहित्य देखील जप्त करण्यात आलेले आहे.


या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.07एप्रिल) रोजी स्था.गु.शा. चे पथक बंदोबस्त पेट्रोलींग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की जिंतूर ते ओढा रोडवर एमआयडीसी परिसरात एका मोटारसायकल वर 3 व दुसऱ्या मोटार सायकलवर 2 असे 5 ईसम दरोडा टाकण्याच्या उद्देशाने तयारीनिशी दबा धरून बसलेले आहेत. अशी माहिती मिळताच तात्काळ पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी व अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे व पो.नि.स्था.गु.शा. अशोक घोरबांड यांना माहिती दिली. त्यावरून पोलिस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेश व सुचनांनुसार जिंतूर पो.स्टे. चे अंमलदारांसह सापळा रचून मोठ्या शिताफीने 1) अजिंक्य दिगंबर जगताप, (वय 26 वर्ष), रा.पुंगळा तालुका, जिंतूर, 2) मुंजा तुकाराम कहाते, (वय 20 वर्ष), रा.पिंपरी देशमुख तालुका जिल्हा परभणी, 3) दिपक दादाराव सावणे, (वय 24 वर्ष), पिंपरी देशमुख तालुका जिल्हा परभणी 4) गौरव लोमेशराव जगताप, (वय 27 वर्ष), रा.पुंगळा तालुका, जिंतूर, जिल्हा परभणी व 5) प्रल्हाद विठ्ठल जाधव, (वय 20 वर्ष), रा.पुंगळा तालुका जिंतूर यांना स्था.गु.शा. च्या पथकाने जिंतूर पो.स्टे. अंमलदार व काही नागरीकांच्या मदतीने सापळा रचून घेराव घालून ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीतांबाबत सखोल माहिती घेतली असता त्यांच्यावर परभणी जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात देखील यापुर्वी खुनासह दरोडा, चोरी, रायट (दंगा), चोरी व दरोडा असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यांचे ताब्यातून दोन मोटर सायकल, एक धारदार खंजर, टोकदार तलवार आणि टामी, दोऱ्या असा एकूण 1,52,950/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पुढील कार्यवाही कामी पोलिस स्टेशन जिंतूर येथे येऊन गु.र.नं. 203/24, 399,402 भा.दं. वि. सह 4/25 शस्त्र अधीनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे. सदरचे आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून त्यांच्या कडून परभणी जिल्ह्यातील आणखी काही घरफोडी व जबरी चोरीचे गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी ही पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह संतोषसिंह परदेशी आणि अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अशोक घोरबांड पोलिस उपनिरीक्षक अजीत बिरादार, पोलिस अंमलदार बालासाहेब तूपसुंदरे, रवी जाधव, सिद्धेश्वर चाटे, घुगे, नामदेव डूबे, निलेश परसोडे स्था.गु.शा. व जक्केवाड व वाघमारे पो.स्टे. जिंतूर यांनी मिळून केली आहे.



