राज्यभर मोटारसायकल चोरणारा सराईत मोटारसायकल चोरटा परभणी पोलिसांचे ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

 राज्यभरात मोटारसायकल चोरणारा सराईत मोटारसायकल चोरटा परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,१० गुन्हे उघड करुन २० मोटारसायकल केल्या जप्त….

परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांनी परभणी शहरात होणाऱ्या मोटार सायकल चोरीचा आढावा घेतला व त्याची गांभीर्याने दखल घेवून गुन्हे उघडकीस आणून आरोपीस अटक करणे बाबत आदेशीत केले होते. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी स्था.गु.शा. चे  अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांची पथके तयार करून त्यांना तसे  आदेश व सुचना
देण्यात आले. स्था. गु.शा.च्या पथकाने परभणी शहरातील चोरीस गेलेल्या मोटार सायकलच्या तपास सुरू केला





सदर गुन्ह्या संदर्भाने स्था. गु.शा. चे पोउपनि अजित बिरादार, पोलिस अंमलदार बालासाहेब तुपसमूद्रे, रवि जाधव, रफियोद्दीन शेख, निलेश परसोडे, हुसेन पठाण व सायबर चे गणेश कौटकर बालाजी रेड्डी, गौस पठाण यांनी उपलब्ध माहितीच्या आधारावरून बारकाईने तांत्रीक विश्लेषन करून मोटार सायकल चोरीचे बरेच गुन्हे अट्टल मोटारसायकल चोरटा अखील महेबुब शेख, रा. मंगळवार पेठ, आंबोजोगाई, जि. बिड ह. मु. परभणी याने केले असल्याचे निष्पन्न झाल्याने,त्याच्या विरूध्द पुरावे गोळा करून त्यास शिताफीने सापळा रचून परळी येथून ताब्यात घेतले असता त्याने परभणी सह
इतर जिल्ह्यातील गुन्हे करून अनेक मोटार सायकल चोरल्याची माहिती दिली. त्यावरून स्था. गु.शा. चे स.पो.नि. भारती,मुत्येपोड, पोउपनि गोपिनाथ वाघमारे, अजित बिरादार यांचे अधिपत्याखाली 4 पथके तयार करून आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे बिड परळी, लातूर, मरूड, बार्शी-सोलापूर अशा विविध जिल्ह्यातून 20 मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.



त्याने चोरलेल्या मोटारसायकलची विल्हेवाट लावणारा त्याचा आणखी एक साथीदार असून त्याच्या कडे काही मोटारसायकल
असल्याबाबतची माहिती आरोपीने दिली असून त्याचा शोध देखील स्था. गु.शा. कडून चालू आहे. सदर आरोपीस मा.न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने त्यास 30/05/2024 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.



सदरची कारवाई  पोलिस अधीक्षक  रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक  यशवंत काळे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलिस निरीक्षक स्था.गु.शा. अशोक घोरबांड यांचे नेतृत्वाखाली स.पो.नि. भारती,.मुत्येपोड, पोउपनि गोपिनाथ वाघमारे,अजित बिरादार, पोलिस अंमलदार बालासाहेब तुपसमूद्रे, रवि जाधव, रफियोद्दीन शेख, निलेश परसोडे, विलास सातपूते, राहूल परसोडे, रंगनाथ दुधाटे, सचिन भदर्गे, विष्णू चव्हाण,सिध्देश्वर चाटे, शेख रफीयोदिन, निलेश परसोडे, हनुमान ढगे, संजय घुगे, नामदेव डुबे, मधुकर ढवळे, राम पौळ, दिलीप निलपत्रेवार, परसराम गायकवाड, हुसेन पठाण, कैलास केंद्रे ने.स्था.गु.शा. व सायबर चे गणेश कौटकर बालाजी रेड्डी, गौस पठाण यांनी केली

सदर आरोपी कडून आत्ता पर्यंत 20 मोटार सायकल जप्त करण्यात आल्या असून त्यातून परभणी जिल्ह्यातील-06, सोलापूर-02 व लातूर- 02 असे एकूण 10 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. इतर मिळून आलेल्या मोटारसायकल संबंधाने दाखल गुन्ह्यांची माहिती घेणे चालू आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!