औद्योगिक वसाहतीत चोरी करणारी टोळी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

औद्योगिक परिसरामधील कंपन्यांमध्ये  तांब्याची चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी चिखली पोलीसांकडुन जेरबंद….

चिखली(पिंपरी-चिंचवड)महेश बुलाख – सवीस्तर व्रुत्त असे की,पिंपरी चिंचवड पोलिस आक्तालयातीला औद्योगिक परिसरामध्ये अनेक वर्कशॉप, स्मॉल इंडस्ट्रीज असे अनेक लहान मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत. गेले काही दिवसांपासुन औदयोगिक परिसरामध्ये चो-यांचे प्रमाण वाढले होते. त्याला प्रतिबंध करण्याचे दृष्टीने चिखली पोलिस स्टेशनकडील तपास पथकांमार्फत रात्रीचे वेळी पेट्रोलिंग नेमण्यात आली असून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे दृष्टीने चिखली पोलिस स्टेशन मार्फत वेळोवेळी ट्रॅप लावण्यात आले होते. वाढत्या घरफोड्याचे प्रमाण विचारात घेऊन चिखली पोलिस स्टेशनचे वरीष्ट पोलिस निरीक्षक  ज्ञानेश्वर काटकर यांनी सहा.पोलिस निरीक्षक तोफ़िक सय्यद याच्या नेतृत्वाखाली एक पथक स्थापन करून त्याच्यावर ही जबाबदारी सोपविलेली होती.
सदरच्या पथकाने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात घडलेल्या घरफ़ोडीचे गुन्हयाचे सिसिटिव्ही फुटेज प्राप्त करून घेऊन त्याचा
अभ्यास केला असता म्हाळुंगे, दिघी तसेच चिखली पोलिस स्टेशन हद्दीत झालेल्या घड़फोडीचे गुन्हे करणारे आरोपी एकच
असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी पुढे तपास करुन आरोपीचा मागोवा घेण्यास सुरवात केली. गुन्हाचे ठिकाणी
आरोपीचा येण्याचा मार्ग व परत जातांनाचा मार्ग तसेच त्यांनी वापरलेली वाहने याबाबतचा तपास आरोपीचा म्हाळुंगे, दिघी तसेच
चिखली परीसरातील घरफ़ोडीच्या ठिकाणापासुनच्या सर्व रस्त्यावरील सिसिटिव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली.
तपासांअती आरोपी हे गुन्हा करत असताना दोन मोटरसायकल वरुन येत असुन चोरी केलेला माल एका टेम्पोने नेत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. सिसिटिव्ही चे फुटेज तसेच परीसराचा डम्प डाटा काढून त्याचे तात्रीक विश्लेषण केले
असता ठराविक फ़ोन नंबर हे गुन्हा घडताना घटनास्थळाचे परीसरातच असल्याचे त्यांचे लक्षात आले. तांत्रीक तपासावरुन आरोपी





१) अब्दुलकलाम रहिमान शहा वय २३ वर्षे, राह. ऑरेंज हॉस्पीटलचे मागे, कुदळवाडी, चिखली पुणे, मुळ राह. सिंहोरवा, पो. कडजा, थाणा सेंसजहा, जि. नवगड, राज्य उत्तरप्रदेश



हयास अंगणवाडी चौक, चिखली परीसरात चोरीचा माल विक्रीस
घेऊन येत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास करता त्याने त्याचे साथीदार



१) योगेश तानाजी चांदणे वय २६ वर्षे, धंदा ड्रायव्हर रा.बोल्हाईचामळा, गल्ली नंबर १०, जाधववाडी, चिखली, पुणे मुळ रा. मु. पो. भोसर, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापुर

२) रविशंकर महावीर चौरासिया वय २३ वर्षे, रा बिराजदार यांची रुम, पाटीनगर, मोई गाव, ता.खेड, जि. पुणे, मुळ राह. ग्राम
कमसार, ता.इटवा, थाना त्रिलोकपुर, जि. सिध्दार्थनगर राज्य उत्तरप्रदेश,

३) रिझवान खान, ४) शकील मन्सुरी व दोन विधीसंघर्षग्रस्त बालक या सर्वांनी मिळुन चो-या केल्या असल्याचे सांगुन चोरीतील माल नेण्यासाठी योगेश चांदणे याचा टेम्पो नंबर एम.एच.१४. के क्यू.८२९६ याचा वापर केल्याचे सांगितले. त्याप्रमाणे आरोपी योगेश तानाजी चांदणे व रविशंकर महावीर चौरासिया यांना त्यांचे ताब्यातील टेम्पोसह लागलीच शिताफीने ताब्यात घेवून अटक करण्यात आली. तसेच त्याच्या ताब्यात घरफ़ोडी करण्यासाठी त्यांनी वापरलेले ग्राइंडर मशीन, पोपट पाना, चार्जेबल टयुब लाईट, ब्युटेन गॅस गन, लोखंडी छन्या, कु-हाडीचे पाते, ड्रिलमशीन, स्टील बोल्ड कटर, हॅक्सा फ्रेम, टी पाना, स्क्रू ड्रायव्हर, हातोडा असे घरफोडीसाठी लागणारे साहित्य मिळुन आले.
अटक आरोपींनी तपासादरम्यान पुणे जिल्हयामध्ये त्यांनी गुन्हे केल्याचे ठिकाण दर्शविले त्यानुसार पुढीलप्रमाणे गुन्हे
उघडकीस आलेले आहेत.
१) चिखली पोलिस ठाणे गुन्हा रजि. नं. ६८८/२०२३ भादवी कलम ४५७, ३८० प्रमाणे
(२) चिखली पोलिस ठाणे, गुन्हा रजि. नं. ६७४/२०२३ भादवी कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे
(३) चिखली पोलिस ठाणे गुन्हा रजि. नं. ६२९/२०२३ भादवी कलम ४६१, ३८० प्रमाणे
४) दिघी पोलिस ठाणे गुन्हा रजि. नं. ५६३/२०२३ भादवी कलम ४५४४५७, ३८० प्रमाणे
५) चाकण पोलिस ठाणे गुन्हा रजि. नं. ७९९/२०२३ भादवी कलम ३७९ प्रमाणे
६) चाकण पोलिस ठाणे गुन्हा रजि. नं. ७४२/२०२३ भादवी कलम ४६१, ३८० प्रमाणे
७) कोंढवा पोलिस ठाणे, गुन्हा रजि. नं. ११८९/२०२३ भादवी कलम ४५४, ४५७,३८० प्रमाणे
८) भारती विद्यापिठ पो. ठाणे गु.रजि. नं. ७७५/२०२३ भादवी कलम ३७९ प्रमाणे
अश्या प्रकारे वरील प्रमाणे रु. ५२,६५,९५८/- चे घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात आलेले असुन अटक आरोपीकडून रु. २४,४५,१४०/- किमतीचा मुद्देमाल अदयापर्यन्त हस्तगत करण्यात आलेला आहे.अटक आरोपी व पाहिजे आरोपी हे मुळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी असुन त्यांनी लहान मुलाचा समावेश असणारी एक गुन्हेगारी टोळी त्यांनी निर्माण केलेली असुन ते टोळीने पुणे शहरात येतात. एक ठिकाणी खोली भाड्याने घेऊन राहतात व रेकी
करून रात्रीच्या वेळेस बंद असणा-या कंपन्यामध्ये रात्रीच्या घरफोडया करून ताब्याचा माल चोरत असल्याचे तपासात निष्पन्न
झालेले आहे.
सदरची कामगिरी  डोईफोडे, पोलिस उपआयुक्त परिमंडळ-३, पिंपरी चिंचवड,  विवेक मुगळीकर,सहा.पोलिस आयुक्त, भोसरी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली  ज्ञानेश्वर काटकर, वरीष्ठ पोलिस निरीक्षक, चिखली पोलिस स्टेशन यांचे अधिपत्याखाली गुन्हे प्रगटीकरणे शाखेचे सपोनि तौफिक सय्यद, पोहवा  बाबा गर्जे, सुनिल शिंदे,
चेतन सावंत, विश्वास नाणेकर,भास्कर तारळकर,संदिप मासाळ, दिपक मोहिते, पोनाअमर कांबळे, कबीर पिंजारी, पोशि संतोष सकपाळ, संतोष भोर यांनी यशस्वी रित्या पार पाडली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!