
जेष्ठ नागरीक यांचे तोंडास मिरची पावडर चोळुन रक्कम लुटणारी टोळी गुन्हे शाखेच्या ताब्यात…
पिंपरी-चिंचवड( महेश बुलाख ) – सवीस्तर व्रुत्त असे की,निगडी पोलिस ठाणे गुरनं ६६६ / २०२३ भादवि कलम ३९४, ३४ या गुन्हयातील फिर्यादी
प्रकाश भिकचंद लोढा, वय ६८ वर्षे, रा. एल आय जी कॉलनी, सिंधुनगर, प्राधिकरण,निगडी, पुणे.
हे दिनांक १४/११/२०२३ रोजी रात्रौ २२:४५ वाचे सुमारांस जाधववाडी, तळवडे,मोरेवस्ती चिखली येथे मनी ट्रान्सफरची एकुण मिळुन २७,२५,८००/- रू रोख रक्कम गोळा करून त्यांचे स्कुटरवरून दुर्गानगर चौकाकडुन रहाते घरी जात असताना, हत्ती चौक ते एल आय सी कॉर्नर दरम्यान, यमुनानगर निगडी पुणे येथे आले असता त्यांचे पाठीमागुन मोटार सायकल वरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांचे स्कुटरला धक्का देवुन फिर्यादी यांचे
चेहऱ्यावर मिरची पावडर लावुन, त्यांना जखमी करून धक्का बुक्की करून, त्यांचे जवळील रोख रक्कम असलेली पैश्याची सॅक बॅग जबरदस्तीने हिस्कावुन घेवुन गेले होते त्याबाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता
वरील प्रमाणे गंभीर गुन्हा नोंद झाल्यानंतर, गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हे शाखेतील सर्व युनिट व शाखा यांना सदर गुन्हयाचा समांतर तपास करणेबाबत आदेशीत केले होते. त्याप्रमाणे पोलिस उपआयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे
सहा पोलिस आयुक्त, गुन्हे १, बाळासाहेब कोपनर यांनी सदर गुन्हयाचा समांतर तपास करनेकामी गुन्हे शाखा युनिट १ चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांना आदेश दिले.
त्याप्रमाणे वरीष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश गायकवाड, संतोष पाटील यांनी दरोडा विरोधी पथक, युनिट- १,२,३,४ खंडणी विरोधी पथक व तांत्रिक विश्लेषन विभागाचे अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी
पथके तयार करून, सदर गुन्हयाचा समांतर तपास सुरु केला होता. त्याप्रमाणे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देवुन, प्राप्त प्राथमीक माहितीच्या आधारे फिर्यादी यांचे कलेक्शन करण्याच्या मार्गे याची पाहणी करून स्थानिक परिसरातील गोपनीय बातमीदारामार्फत माहिती संकलित करून, दोन अनोळखी निष्पन्न केले. त्याअनुषंगाने तपास करीत असताना, मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे आरोपी


१) विशाल साहेबराव जगताप, वय २५ वर्षे, रा. श्रीराम कॉलनी, टॉवर लाईन, चिंचेचा मळा, मोरेवस्ती, चिखली, पुणे. मुळगाव :- मुं.पो. संक्रापुर, ता. राहुरी, जि. अहमदनगर

यास कुरूळी फाटा, पुणे नाशिक हायवे येथुन दरोडा विरोधी पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. त्याचेकडुन गुन्हयातील चोरी केलेल्या रक्कमेपैकी त्याचे वाटयास आलेली ८,०१,५००/- रू रोख रक्कम त्याचेकडुन हस्तगत केली.

आरोपी विशाल जगताप याच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने कौशल्यपुर्वक तपास करून त्याचे पाहिजे आरोपी साथीदार
२) लालबाबु बाजीलाल जयस्वाल वय २८ वर्षे धंदा- मोबाईल
शॉपी रा. मुळ बकरी बाजार तहसिल भाटपाराणी जिल्हा देवारीया राज्य उत्तरप्रदेश सध्या तुळजाभवानी चौक, टॉवर लाईन चिखली, पुणे.
३) जावेद अकबर काझी वय ५० वर्षे धंदा-पोर्टर अॅप डिलेव्हरी रा. फ्लॅट नंबर ४, ताजविस्टा किवळे देहूरोड पुणे
४) अभिषेक दयानंद बोडके वय १९ वर्षे धंदा- मोबाईल दुकानामध्ये कामाला रा. बोडके निवास, माऊली हौसिंग सोसायटी, मोरेवस्ती चिखली, पुणे
यांना चिखली परिसरातुन शिताफीने ताब्यात घेतले. वरील चारही आरोपींना पुढील कार्यवाही कामी निगडी पोलिस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तद्नंतर सदर गुन्हयाचा समांतर तपास सुरू ठेवुन, स्थानिक माहितीवरून व तांत्रिक विश्लेषनाच्या तपासावरून संशयीत इसम
धिरेंद्र असवाणी सिंग हा मनोज जयस्वाल याचे सतत संपर्कात असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी
५) धिरेंद्र सिंग असवाणी सिंग, वय ३८ वर्षे, रा. संगम हौसिंग सोसायटी, टॉवर लाईन, मोरेवस्ती, चिखली, पुणे
यास ताब्यात घेवुन, त्याकडे अधिक तपास केला असता, मनोज जयस्वाल याने त्याच्याकडे १३,००,०००/- रोख रक्कम ठेवली होती. त्यापैकी काही रक्कम त्याने मनोज जयस्वाल याचे सांगणेवरून
वेगवेगळया खात्यामध्ये पाठविली. क्रेडीट कार्डचे पैसे भरले, सोसायटीचे लोन भरले, इतर आरोपींचे विमानाचे तिकीट काढले, तसेच सोन्याचे दागिने व ०१ मोबाईल फोन खरेदी केला
असे निष्पन्न झाले आहे. नमुद आरोपी धिरेंद्र सिंग असवाणी सिंग याने पाठविलेली रक्कमेचे वेगवेगळे खाते गोठविण्याची कारवाई करण्यात आली आहे. तसेच इतर मालमत्ता हस्तगत करण्यात येत आहे.
पुढील तपास निगडी पोलिस ठाणे करीत आहे. अद्याप पर्यंत ११,३५,४००/- रोख रक्कम व इतर मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. दाखल गुन्हयातील अटक आरोपी यांनी त्यांचे पाहिजे आरोपी साथीदार यांचेसह फिर्यादी यांचेकडील कामगार मोहन वैद्य यास दोन वेळा लुटण्याचा प्लॅन केला होता परंतु तो अयशस्वी झाला होता.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त संजय शिंदे,अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, पोलिस उप आयुक्त डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) सतिश माने, सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे – १) बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश गायकवाड, संतोष पाटील, सपोनि अंबरिष देशमुख, पो. उपनि इम्रान शेख, भरत गोसावी, गणेश माने, तसेच दरोडा विरोधी पथक, युनिट १, २, ३, ४, खंडणी विरोधी पथक व तांत्रिक विश्लेषन विभागातील अंमलदार यांनी केली आहे.


