
अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरुन चुलत भावाचा केला खुन आरोपी अटकेत,वाकड पोलिसांची कामगिरी…
चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपींच्या वाकड पोलिसांनी आवळल्या मुसक्या…
पिंपरी चिंचवड (महेश बुलाख) – वाकड पोलिस ठाणे हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्या मध्ये वहीणी सोबत संबंध असल्याच्या संशयावरुन चुलत भावाचा खुन करणाऱ्या आरोपीला त्याच्या साथीदारासह अटक केली आहे. या प्रकरणी मयत नामे- प्रमोद यादव याचा भाऊ विरेंद्रकुमार यादव यांनी वाकड पोलिस ठाण्यात खुनाची तक्रार दाखल केली होती. सदरची घटना ही अत्यंत गंभीर स्वरुपाची असल्याने गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड पोलिस ठाणे यांनी तपास पथकातील पोउपनि. सचिन चव्हाण व पोउपनि, अनिरुध्द सावर्डे यांना गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अंमलदार यांना तात्काळ सदरच्या गुन्हयातील आरोपींची नावे निष्पन्न करुन त्यांना ताब्यात घेणेबाबत आदेश दिले होते.


या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.२१जानेवारी) रोजी सकाळी स्टेशन हाऊस ऑफीसर यांना माहीती मिळाली की, कोहीनूर सफायर ताथवडे पुणे येथे एक मजुर बेशुध्द् अवस्थेत बिल्डींगच्या पाय-यांवर पडलेला आहे. अशी माहीती मिळाल्या नंतर गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक अनिरुद् सावर्डे व पोउपनि. सचिन चव्हाण हे तपास पथकासह घटनास्थळी दाखल झाले आणि माहिती घेण्यास सुरुवात केली. मयताचे पोस्टमार्टम झाले नंतर समजले की, मयताचा गळा आवळुन त्याचा खुन करणेत आला आहे तसेच त्याचे छातीवर मुका मार मारल्याच्या खुना आहेत. बांधकाम मजुराचा खुन झाल्याचे निष्पन्न झाल्या नंतर मयत नामे- प्रमोद यादव याचा भाऊ विरेंद्रकुमार यादव यांनी वाकड पोलीस स्टेशन मध्ये खुनाची तक्रार दाखल केली. सदरची घटना अत्यंत गंभीर स्वरुपाची असल्याने गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड पोलिस ठाणे यांनी तपास पथकातील पोउपनि. सचिन चव्हाण व पोउपनि, अनिरुद्ध सावर्डे यांना गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अंमलदार यांना तात्काळ सदरचे गुन्हयातील आरोपींची नावे निष्पन्न करुन त्यांना ताब्यात घेणेबाबत आदेश दिले.

त्याप्रमाणे पोउपनि सचिन चव्हाण व पोउपनि. अनिरुध्द् सावर्डे यांनी दोन वेगवेगळे पथके तयार करुन बांधकाम साईडवरचे मयताचे सहकारी व मयताचे सोबत बिल्डींग मध्ये झोपलेला त्याचा चुलत भाऊ अनुज यादव यांच्याकडे वेगवेगळी चौकशी सुरु केली असता माहीती मिळाली की, मयत प्रमोद यादव याचा चुलत भाऊ अनुज यादव यांच्यात दोन महीन्यापुर्वी अनुज यांच्या वहीणी सोबत संबंध असलेचे कारणावरुन वाद झाला होता. तसेच मयत प्रमोद हा अनुज याचे बहीणीस वारंवार फोन करुन त्रास देत होता. अशी माहीती मिळाले नंतर अनुज यादव यांचेकडे त्यास विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली देवुन सांगीतले की, प्रमोद यादव हा त्याचे वहीणीस तसेच साथीदार लवकुश यादव याचे होणारे पत्नीस फोन करुन त्रास देत होता. यामुळे अनुज यादव व लवकुश यादव यांनी मिळुन प्रमोद यादव याचे सोबत दारु पिवुन त्यास झोपायचा बहाणा करुन घेवुन बांधकाम चालु असलेले बिल्डींग मध्ये घेवुन जावुन अनुज यादव याने प्रमोद यादव याचा गळा आवळुन खुन केला व लवकुश यादव याने प्रमोद याचे छातीत लाथा घालुन त्याचे पाय धरुन ठेवुन खुन करण्यास मदत केली. या आरोपींना अटक केली असुन पुढील तपास सपोनि निलेश नलावडे हे करीत आहे.

सदरची कारवाई ही विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड, डॉ. संजय शिंदे, सह पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, बापु बांगर, पोलीस उप आयुक्त, परि-२ पिंपरी चिंचवड, डॉ. विशाल हिरे, सहा. पोलिस आयुक्त वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विठ्ठल साळुंखे, पोलिस निरीक्षक (गुन्हे), पोउपनि. सचिन चव्हाण, पोउपनि. अनिरुद् सावर्डे, सफौ बिभीषण कन्हेरकर, सपोफौ. राजेंद्र काळे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. बंदु गिरे, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. दिपक साबळे, पोहवा, अतिश जाधव, पोहवा. विक्रांत चव्हाण, पोहवा. अतिक शेख, पोना. रामचंद्र तळपे, पोशि. भास्कर भारती, पोशि. स्वप्निल लोखंडे, पोशि. काँतेय खराडे, पोशि रमेश खेडकर, पोशि. ज्ञानदेव झेंडे, पोशि. सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी मिळुन केली आहे.


