
अट्टल मोटारसायकल चोरटा भोसरी पोलिसांचे ताब्यात…
अट्टल मोटारसायकल चोरट्यास भोसरी पोलिसांनी केली अटक…
पिंपरी चिंचवड (महेश बुलाख)- जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये या साठी योग्य ती खबरदारी म्हणून पोलीस अधीक्षक यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या म्हणून भोसरी पोलिसांचे पथक हे कारवाई साठी गस्तीस असताना मिळालेल्या माहितीवरून आणि सीसीटिव्ही द्वारे कौशल्यपूर्ण तपास करून एका अट्टल मोटारसायकल चोरट्याला शिताफीने अटक करून त्याला विश्वासात घेऊन त्याने भोसरी व पिंपरी शिरुर येथे मोटार सायकल चोरी केल्याचे कबूल केले आहे. या मध्ये चोरीच्या ०७ मोटारसायली जप्त केल्या आहेत.


या बाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत भोसरी पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात रहिवासी व रहदारी असणारे क्षेत्र असल्याने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १. श्रीमती स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग बाळासाहेब कोपनर यांनी वारंवार होणा-या मोटारसायकल चोरीच्या घटनांना पायबंद घालून मोटारसायकल चोरीबाबतचे गुन्हे उघड करण्याबाबत शिवाजी गवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भोसरी पोलीस ठाणे यांना सुचना दिल्या होत्या.

तेव्हा शिवाजी गवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भोसरी पोलीस ठाणे यांनी भोसरी पोलीस ठाणे हद्दीत वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक बालाजी जोनापल्ले, पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे व अमलदारांना मार्गदर्शन करून त्यांना सुचना दिल्या. तपास पथक अधिकारी, अंमलदार यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणांना भेटी देउन परिसरातील सीसीटिव्ही द्वारे बारकाईने तपास केला. सातत्याने विविध ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज तपासत तसेच सदर व मोटारसायकल चोरी करणा-या चोरट्याबाबत माहिती प्राप्त केली.

त्या ठिकाणी सापळे लावुन (दि.२६जानेवारी) रोजी शिवाजी गवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भोसरी पोलीस ठाणे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक बालाजी जोनापल्ले, पोलीस उप निरीक्षक मुकेश मोहारे, पोलीस अंमलदार सपोफी बोयणे, पोहवा. खरात, पोशि नरवडे, पोशि खाडे, पोशि गोपी, पोशि जाधव, यांनी मोटारसायकल चोरटयांचे सीसीटिव्ही फुटेज तसेच सापळे लावुन आरोपी नामे मोहमंद राशीद शाहीद शेख (वय-२० वर्षे), धंदा-वाशिंग सेंटरवर कामास रा. दिनेश पाटील यांच्या वांशिग सेंटर, डी वाय पाटील कॉलेजच्या बाजुला वल्लभनगर पिंपरी पुणे यास पीएमटी चौक भोसरी पुणे येथून सापळा लावुन ताब्यात घेतले.
सदर आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने भोसरी व पिंपरी शिरुर येथून चोरी केलेल्या ०७ मोटारसायकल काढून दिलेल्या असून त्या गुन्हयाच्या तपासकामी जप्त करण्यात आलेल्या आहेत.
भोसरी पोलीस ठाणेकडील तपास पथक अधिकारी व अंमलदार यांनी अतिशय शिताफीने व कौशल्यपूर्ण तपास करून अटक आरोपी नामे मोहमंद राशीद शाहीद शेख वय-२० वर्षे, धंदा-वाशिंग सेंटरवरकामास रा. दिनेश पाटील यांचे वांशिग सेंटर, डी वाय पाटीलकॉलेजच्या बाजुला वल्लभनगर पिंपरी पुणे याचेकडून एकूण ०७ चोरीच्या मोटारसायकल हस्तगत करून मोटारसायकल चोरीचे एकूण ०६ गुन्हे उघडकीस आणून रूपये २,३०,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.
अशा प्रकारे सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड, विनयकुमार चौबे, सह. पोलिस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त, वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त परि. १. श्रीमती स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त, पिंपरी विभाग, बाळासाहेब कोपनर, यांच्या सुचना व प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शिवाजी गवारे, पोउनि बालाजी जोनापल्ले, पोउपनि मुकेश मोहारे, सपोफौ बोयणे, सपोफौ चव्हाण, पोलिस हवालदार हेमंत खरात, डी बी केंद्रे, रमेश भोसले, मपोहवा मुळे, पोना नवनाथ पोटे, प्रकाश भोजने, तुषार वराडे, स्वामी नरवडे, सागर जाधव, प्रभाकर खाडे, महादेव गारोळे, पोशि साळवे, यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.


