
देहुरोड पोलिसांनी दोन सराईत दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेऊन २१ गुन्हे केले उघड…
दोन मोटारसायकल चोरट्यांना देहूरोड पोलिसांनी केली अटक; साडेचौदा लाखांचा मुद्देमाल जप्त…
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – देहूरोड पोलिसांनी दोन सराईत मोटार सायकल चोरट्याना शिताफिने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २१ मोटार सायकल ह्या जप्त करून २१ गुन्हे उघडकीस आणले आहेत. ज्या मध्ये १४ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


या बाबत सविस्तर वृत्त असे की, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालया अंतर्गत मोटार सायकल चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सर्व पोलिस स्टेशन हद्दीतील मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना राबविणे व गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले होते.

त्या अनुषंगाने देहूरोड पोलिस स्टेशनचे तपास पथकाला काही इसम चोरीची दुचाकी देहूरोड बाजार परीसरात स्वामी चौक येथे घेवुन येणार आहे. अशी बातमी मिळाली त्या बातमीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी सापळा लावला असता बातमी प्रमाणे दोन इसम एका दूचाकी ज्युपीटर स्कूटरवरून आले. तेव्हा लगेच त्यांना तपास पथकांच्या अंमलदारानी शिताफीने ताब्यात घेतले त्यांचे नाव १) आकाश शंकर जाधव, (वय २४ वर्ष), रा.टॉवर लाईन, चिखली, मु.पत्ता. कोळसुर, ता.उमरगा, जि.उस्मानाचाद २) आशुतोष नानासाहेब घोडके, (वय २३ वर्ष) रा.गुरदत्त ही सोसायटी, त्रिवेणीनगर, टॉवलाईन, चिखली प्रमाणे असुन त्यांच्या ताब्यात मिळुन आलेली दुचाकी मोटार स्कुटी बाबत अधिक तपास केला असता सदरची मोटार स्कुटी ही देहूरोड पोलीस स्टेशन गुरनं. ३४७/२०२४ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहीता या गुन्ह्यातील चोरीस गेली असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना नमुद गुन्ह्यात दि.२७ऑगस्ट रोजी अटक केले. त्यांची अधिक पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करून त्यांच्याकडे अधिक कौशल्याने तपास केला असता त्यांनी देहूरोड पोलीस स्टेशन हद्दी व्यतीरिक्त पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनेक मोटार सायकली चोरी केल्याचे कबुल केल्याने देहूरोड पोलीस ठाण्याचे तपास पथक यांनी वरिष्ठांच्या परवानगीने नागझरी, ता.जि. बीड येथुन तपास करून चोरी केलेल्या २१ मोटर सायकली त्यांची एकुण १४,४५,०००/- रुपये किंमतीच्या जप्त करून करून २१ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलिस आयुक्त शशीकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त परिमंडळ-२, विशाल गायकवाड, सहाय्यक पोलिस आयुक्त, देहूरोड विभाग देवीदास घेवारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय वाघमारे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोनि गुन्हे विजयकुमार वाकसे, तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सोहन धोत्रे, पोलिस उपनिरीक्षक अजयकुमार राठोड, पोलिस अंमलदार बाळासाहेब विधाते, सुनिल यादव, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडीक, युवराज माने, शुभम बावनकर, कैलास उल्हारे, खंड विरणक, मंगेश लोखंडे यांनी केली आहे.


