पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी वर्षाच्या पहील्याच दिवशी ६० सराईत गुन्हेगारांवर केली मोक्का अंतर्गत कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

पिंपरी चिंचवड(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पिंपरी- चिंचवड शहराचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे अॅक्शन मोडवर आल्याच पाहायला मिळत आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी १२ संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील ६० आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई केली आहे. २०२३ मध्ये आतापर्यंत एकूण ५१ गुन्हेगारी टोळ्यांमधील ३५७ आरोपींवर मोकाअंतर्गत कारवाई केली आहे. यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्याचे संकेत दिसत आहेत.

दरम्यान, पिंपरी चिंचवड शहराचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शहरातील गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे अनेकदा आढळले आहे. शहरातील गुन्हेगारांवर वचक
राहण्यासाठी नेहमीच त्यांनी कठोर पावलं उचलत करावी देखील केली आहे. आता नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी १२ संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील ६० आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.





यामध्ये या गुन्हेगारांवर हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, तोडफोड करणे, विनयभंग करणे, अपहरण,खंडणी, दंगा, अश्लील वर्तन करणे, जिवे ठार मारण्याची धमकी देणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच चोरीचा मुद्देमाल घेणाऱ्या तीन सराफांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केलेली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!