सराईत गुन्हेगारास गावठी पिस्टलसह भोसरी MIDC पोलिसांनी घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

एमआयडीसी भोसरी(पिंपरी चिॅचवड) महेश बुलाख – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक २०/११/२०२३ रोजी एमआयडीसी भोसरी पोलिस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार खाजगी वाहनाने पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिस हवालदार गवारी  यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की यशवंतनगर चौक, सेक्टर नं. ७, एम.आय.डी.सी. भोसरी, पुणे येथे एक इसम हा कंबरेला पिस्टल लावुन थांबला आहे. त्याचे अंगात काळे रंगाचा शर्ट व निळया रंगाची पॅन्ट आहे. अशी बातमी मिळाल्याने त्यांनी सदरची बातमी राजेंद्र निकाळजे  वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना कळविली असता त्यांनी सदर ठिकाणी छापा घालुन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने तपास पथकातील अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सचिन चव्हाण व अंमलदार बातमी मिळाले ठिकाणी यशवंतनगर चौक, सेक्टर नं. ७. एम.आय.डी.सी. भोसरी, पुणे येथे जावुन दुपारी २.१५ वा छापा घातला असता सदर ठिकाणी वरील वर्णनाचे कपडे घातलेला इसम मिळुन आल्याने त्यास पकडुन त्यास त्याचे नाव  व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव

सुरज प्रदिप शिंदे वय २४ रा. खोली नं १६ राजवाडा इंद्रायणी नगर भोसरी पुणे





असे सांगीतले. त्याची पंचाचे समक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेला लावलेला एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत
राउंड मिळुन आले त्यांचे वर्णन खालील प्रमाणे-
१) २५,००० /- रुपये किंमतीचे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल मॅगझीन असलेली तीचे मुठेस दोन्ही बाजुने फायबरचे स्कुने लावलेली तपकिरी रंगाची पट्टी त्यावर दोन्ही बाजुस निळया रंगात पंचकोनी स्टार असलेली ३००-०० /- रुपये किंमतीचा एक जिवंत पिस्टलचा राऊंड त्याचे मागील बाजुस इंग्रजीमध्ये के. एफ. असे व ७.६५ लिहले असलेले २५,३००/- रुपये एकुण किंमतीचे प्रमाणे वरील वर्णनाचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो पंचाचे समक्ष गुन्हयाचे पुढील तपास कामी सचिन चव्हाण पोलीस निरीक्षक यांनी ताब्यात घेतले  आरोपी विरुध्द एमआयडीसी भोसरी पोलिस स्टेशन.गु. रजि. नं. ५८८/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलिस अधि.कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन
सदर आरोपीस मा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पिंपरी कोर्ट, पुणे यांचे कोर्टात हजर केले असता त्यास मा. न्यायालयाने दि. २३/११/२०२३ पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड दिली आहे. सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील असुन त्याचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) एमआयडीसी भोसरी पो.स्टे. गु.र.नं. १४२/१७ भादवि ३३२, ३५३३२३, ५०४, ५०६ (१).३४
२) एमआयडीसी भोसरी पो.स्टे. गु.र.नं. ३४/१८ भादवि ४५२,५०६ (२),५०४.३४ भा.ह. का. कलम ४ (२५). म. पो.अधि. ३७(१) १३५
३) एमआयडीसी भोसरी पो.स्टे. गु.र.नं. ४२६/२१ भां.दं.वि. क.३५४ (अ) (ड)
४) एमआयडीसी भोसरी पो.स्टे. गु.र.नं. २९६ / २३ भा.ह.का. कलम ४(२५).म.पो.अधि. ३७(१)१३५
सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त  विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी,  पोलिस उपायुक्त  संदिप डोईफोडे परि-०३, मा सहाय्यक पोलिस आयुक्त  विवेक मुगळीकर, MIDC भोसरी पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  राजेंद्र निकाळजे, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास
पथकातील पोलिस उप-निरीक्षक सचिन चव्हाण, पोलिस अंमलदार चंद्रकांत गवारी, शरद गांधिले, संजय जरे, स्वप्निल शेलार, गणेश बोर्हाडे दातार, प्रविण मुळुक, नितिन खेसे, भागवत शेप, विशाल काळे, अक्षय क्षिरसागर यांनी केली आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास एम.आय.डी.सी भोसरी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अशोक तरंगे हे करीत आहेत.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!