निगडी येथे चालणार्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेने केला पर्दाफाश…
निगडी(पिंपरी-चिंचवड) सुनील सांबारे—
पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी निगडीतील थरमॅक्स चौकातील एका लॉजमधून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दोन महिला आणि एका एजंटसह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या महिलेची पोलिसांनी सुटका केली आहे. पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, निगडीतील अंगण लॉजमधून कथित सेक्स रॅकेट चालवल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने सापळा रचून अवधूत चंद्रसेन लवटे (वय 27) आणि गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन महिलांना ताब्यात घेतले. अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायद्याच्या कलम 4 आणि 5 सह भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 340 (2) आणि 34 अंतर्गत गुन्हा.सयाप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, पुणे शहरामध्ये काही दिवसांपूर्वी मसाज सेंटरच्या
नावाखाली सुरू असलेला वेश्या व्यवसाय उघडकीस आणून गुन्हे
शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने चार पीडित युवतींची
सुटका केली होती. पुण्यातील वानवडी येथील साळुंखे विहारमध्ये
उच्चभ्रू परिसरातील गिरमे हाईट्समध्ये ‘गोल्डन टच स्पा’ नावाचा
मसाज सेंटर चालवण्यात येत होता. या स्पा सेंटरवर केलेल्या
कारवाईत एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली होती.
व्यवस्थापक झारणा उर्फ पिंकी गौतम मंडल (27, रा. कोंढवा)
आणि सुमित अनिल होनखंडे (21) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे होती. तर, स्पा मालक रचना संतोष साळुंखे,
लोचन अनंता गिरमे आणि सार्थक लोचन गिरमे यांच्यावर
वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुणे शहरात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे
पुण्यात सध्या पोलिसांनी वेगवेगळ्या उपाययोजना राबवायला
सुरुवात केली आहे. त्यात रात्रीच्या वेळी गस्त घालण्यापासून तर
खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यावर सापळा रचून छापा
टाकण्यापर्यंत पोलिस उपाययोजना करण्यात येत आहे आणि
अनेक अवैध व्यवसायावर कारवाई देखील करण्यात येत आहे.