
अट्टल दुचाकी चोरटे हिंजवडी पोलिसांचे ताब्यात….
चैनीसाठी दुचाकी चोरणारे अट्टल चोरटे हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात…
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – हिंजवडी पोलिसांनी कसून केलेला तपास, मिळालेली गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण याच्या आधारावर चैनीसाठी दुचाकीची चोरी करणारे दोन अट्टल चोरांना अटक करून चोरीच्या ०५ दुचाकी व १ रिक्षा ही जप्त केली आहे. या प्रकरणी फिर्यादी भारत सोपान जाधव (वय ५३) वर्षे धंदा. ड्रायव्हर रा.आण्णाभाऊ साठेनगर वाकड पुणे मुळगाव- भंडारवाडी ता.धाराशिव जि.धाराशिव यांनी (दि.२१ऑगस्ट) रोजी तक्रार दिली की, (दि.१९ऑगस्ट) रोजी सकाळी ०८/०० वा.सू. ते दुपारी ०१/०० वा दरम्यान महेश बांदल याचे फार्म समोरील रस्त्याचे कडेला जांबे ता.मुळशी जि.पुणे येथुन त्यांची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस गाडी क्रमांक एम एच १४ एच एफ ५९०९ ही चोरीस गेली आहे. त्या वरुन हिंजवडी पोलीस ठाणेत गु.र.नं. ९६०/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.


या बाबत मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्हयाचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि गोमारे, पोहवा शिंदे, पोहवा नरळे, पोशि शिंदे, पो.शि. पालवे असे तपास करीत असताना, पोशि पालवे यांना विश्वासु बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम हा चोरीची मोटारसायकल घेऊन लक्ष्मी चौक, मारूंजी रोड, पुणे येथे येणार आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सपोनि गोमारे, पोहवा शिंदे, पोहवा नरळे, पोशि शिंदे, पो.शि. पालवे यांनी (दि.२१ऑगस्ट) रोजी लक्ष्मी चौक, मारूंजी रोड, पुणे येथे सापळा लावुन इसम नामे १) अक्षय बाबुलाल राकावत, (वय २८), रा.आप्पा बांदल यांची खोली, कोलतेपाटीलच्या मागे, गायकवाड नगर, जांबे, ता. मुळशी, जि. पुणे मुळ रा. मु पो बरवा, ता. बिल्हाड, जि. जोधपुर, राजस्थान २) मदनलाल छोटुराम देवासी, (वय २५), रा. आप्पा बांदल यांची खोली, कोलतेपाटीलच्या मागे, गायकवाड नगर, जांबे, ता. मुळशी, जि. पुणे मुळ गाव रा. रेपडावास, तहसील सौजत, पाली, राजस्थान यांना स्प्लेंडर प्लस गाडी क्रमांक एम एच १४ एच एफ ५९०९ सह ताब्यात घेऊन त्यांना सदर गुन्हयात (दि.२१ऑगस्ट) रोजी २१:३० वा.सू अटक केली. त्यानंतर आरोपींना विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी चोरीच्या आणखी ४ दुचाकी व १ ऑटो रिक्षा चोरी केल्याचे सांगितले त्याप्रमाणे त्या दुचाकी व रिक्षा जप्त करून करून ६ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.

अशा प्रकारे सदरची कारवाई पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे सहपोलिस आयुक्त डॉ. शशीकांत महावरकर,अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी पोलिस उपायुक्त परी.२ विशाल गायकवाड, सहा पोलिस आयुक्त,वाकड विभाग सुनिल कुऱ्हाडे यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, पोलिस निरीक्षक गुन्हे ऋषीकेश घाडगे, तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक राम गोमारे, श्रेणी पोलिस उप निरीक्षक बंडू मारणे, पोलीस अंमलदार बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास कॅगले, कुणाल शिंदे, विक्रम कुदळ, अरूण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, ओमप्रकाश कांबळे, मंगेश लोखंडे यांनी केली आहे.



