लघुशंकेच्या बहाण्याने गाडी थांबवून गाडी आणि मोबाईल घेऊन पोबारा करणार्यास दिघी पोलिसांनी केली अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

दिघी- (पिंपरी-चिंचवड) -महेश बुलाख

सवीस्तर व्रुत्त असे  दिघी पोलिस ठाणे येथे तक्रारदार अशोक पुनवासी जैसवाल वय ३० वर्षे व्यवसाय नोकरी रा सावंतामाळी मंदिर जवळ चंद्रकांत निकम यांचे खोलीत चोली गाव पुणे यांनी तक्रार दिली कि ता. २१/९/२०२३ रोजी रात्रौ ११:४५ वा. चे सुमारास शास्त्री चौक ते च-होली गाव येथे जुपीटर गाडीवरुन जात असताना गव्हाणे पेट्रोलपंपाजवळ अनोळखी इसमाने त्यांच्याकडे लिप्ट मागीतल्याने दिघी गावाकडे ओढयाजवळील जाणा-या रोडच्या बाजुला निर्जन स्थळी अनोळखी इसमाने लघुशंकरीता थांबण्यास सांगुन त्याचेकडील चाकुचा धाक दाखवुन फिर्यादी यांच्या खिशातील विवो कंपनीचा मोबाईल, १८,००० /- रुपये रोख, तसेच ग्रे रंगाची जुपीटर गाडी क्र.एम.एच.१४/एच.ए.९१८१ असा एकुण ३६,००० /- रु. किंमतीचा मुद्देमाल जबरीने काढुन घेऊन अंधाराचा फायदा घेऊन पळुन गेला होता. तसेच तक्रारदार घाबरुन तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणेस आले नाही. फिर्यादी तक्रार देण्यासाठी आल्यांनतर सदर घटनेबाबत तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दिघी पोलीस ठाणे येथे गुरक्रं ४४३/२०२३ भा.द.वि. कलम ३९२ मुं.पो.का.क. ३७ (१) (अ) सह १३५ अन्वये दि. २३/०९/२०२३ रोजी ०२.३६ वाजता गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर  संदिप डोईफोडे ,पोलिस उपायुक्त, परीमंडळ ०३, राजेन्द्रसिंग गौर, सहायक पोलिस आयुक्त, भोसरी एमआयडीसी विभाग,  दशरथ वाघमोडे प्रभारी पोलिस निरीक्षक दिघी पोलिस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली दिघी पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी पोउपनि एस.एम. भदाणे व अंमलदार पोहवा फलके, पोटे, विंचु, कांबळे, जाधव, किरण जाधव, जाधव, पोशि कसबे, भोसले यांनी आरोपीचे नांव पत्ता माहिती नसताना घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे मदतीने व आरोपी यांचे वर्णनावरुन रेकॉर्डवरील आरोपीची माहिती प्राप्त करून आरोपीचा दिघी आळंदी परिसरात शोध घेवून त्याचे नाव निष्पन्न करुन तीन तासाचे आत ताब्यात घेतले.
अटक आरोपीविरुदध खालीलपमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) दिघी पोलिस ठाणे गुरक्रं. ३३५/२१ भादवी कलम ३७९,३४
२) दिघी पोलिस ठाणे गुरक्रं. ३१९/२१ भादवी कलम ३७९, ३४
३) दिघी पोलिस ठाणे गुरक्रं. २८५/२१ भादवी कलम ३७९, ३४
सदरच्या कारवाईत फिर्यादी यांची चोरीस गेलेली १५,०००/- रू कि. ची ग्रे रंगाची जुपीटर गाडी क्र. एम. एच. १४ एच.ए. ९१८१ व गुन्हयात वापरलेला चाकु जप्त करण्यात आली असुन इतर मालमत्तेचा तपास चालु आहे. गुन्हयातील आरोपी अक्षय देवदत्त फालके वय २४ वर्षे रा मौजे शाळेच्या पाठीमागे माऊलीनगर दिघी पुणे यास ता. २३/०९/२०२३ रोजी अटक करण्यात आली असून आरोपी आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. सदर गुन्हयाचा तपास चालु आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!