अट्टल सोनसाखळी चोरट्यास पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केले जेरबंद…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

चैन स्नेचिंग करणाऱ्या आरोपीच्या चिखली पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

पिंपरी चिंचवड (महेश बुलाख) – शहरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत होते म्हणुन पोलिसांचे पथक हे कारवाई साठी गस्तिस होते. या गस्ती वेळी चेन स्नेचिंग करणारा सराईत आरोपी विनोद सिताराम जाधव, (वय-३४ वर्ष), रा.वंदना जाधव यांचे रुममध्ये जाधववाडी चिखली पुणे, मुळगांव रा.तिवसाळा, ता.घाटंजी, जि.यवतमाळ याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.



या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.०५जानेवारी) रोजी दुपारी १.३० वा. चे सुमा. एक वयोवृध्द महीला ही शंकेश्वर कॅपिटल बिल्डींगचे चालु असलेले बांधकाम समोरुन जाधववाडी चिखली पुणे येथुन फुटपाथवरुन पायी घरी जात असतांना तिचे पाठीमागुन एक हिरव्या रंगाचा टी शर्ट घातलेला व तोंडाला मास्क लावलेल्या अनोळखी इसमाने येवुन त्यांचे गळयातील सोन्याची पोत जबरदस्तीने ओढुन पांढ-या रंगाच्या दुचाकी गाडीवर बसुन पळून गेला त्यावेळी सदरबाबत चिखली पोलिस ठाणे गु.रजि.नं. ११/२०२४ भादवि कलम ३९२ या अन्वये नोंद करुन चिखली पोलिस ठाणेकडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, यांचे मार्गदर्शनाखाली चिखली पोलिस स्टेशनकडील उपनिरीक्षक पुजारी तसेच पोलिस अंमलदार गणेश साबळे, गणेश शिंदे, आनंदा नागरे, राकेश बनसोडे नारायण तांबे तसेच गुन्हे शाखा युनिट कडील सोमनाथ बो-हाडे, महादेव जावळे, बाळु कोकाटे, अजित रुपनवर, नामदेव वडेकर असे दोन पोलिस पथक तयार करुन चैन स्नेचिंग गुन्हयातील आरोपीचा शोध घेणेकामी घटनास्थळाचे आजु बाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमे-याचे फुटेज चेक करुन आरोपीचे फुटेज प्राप्त करुन सदरचे सीसीटीव्ही फुटेज हे परिसरातील लोकांकडे प्रसारित करुन त्या आधारे आरोपीचा माग काढत असताना सदर फुटेज मधील इसम हा विनोद सिताराम जाधव, (वय-३४ वर्ष), रा.वंदना जाधव यांचे रुममध्ये जाधववाडी चिखली पुणे मुळगांव रा.तिवसाळा, ता.घाटनजी, जि.यवतमाळ हा असल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्याचा लागलीच शोध घेवुन त्यास त्याचे राहते घरातुन ताब्यात घेतले असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुली दिली असुन त्याचेकडुन दाखल गुन्हयातील १,०८,०००/- रु.कि.ची सोन्याची पोत हस्तगत करुन चिखली पोलिस ठाणेकडील गु.र. रजि.११/२०२४ भादवि कलम ३९२ हा दोन तासाचे आत मध्ये गुन्हा उघड केला आहे.



सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपआयुक्त परिमंडळ-३ संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलिस आयुक्त विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलिस निरीक्षक राजेंद्र बर्गे, पोलिस उपनिरीक्षक पुजारी तसेच पोलिस अंमलदार गणेश साबळे, गणेश शिंदे, आनंदा नागरे, राकेश बनसोडे, नारायण तांबे तसेच गुन्हे शाखा युनिट १ कडील सोमनाथ बो-हाडे, महादेव जावळे, बाळू कोकाटे, अजित रुपनवर, नामदेव वडेकर यांनी केली आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!