
देहु रोड पोलिसांनी सराईत मोटारसायकल चोरट्यास अटक करुन उघड केले ४ गुन्हे…
सराईत वाहन चोरट्यास देहूरोड पोलिस स्टेशन येथील तपास पथकाने घेऊन उघड केले मोटारसायकल चोरीचे ४ गुन्हे….
देहु रोड(पिंपरी-चिॅचवड)महेश बुलाख – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, देहुरोड पोलिस स्टेशन हद्दीमध्ये दि.(२९) रोजी स्वामी चौक, ब्रिज खाली देहुरोड पुणे येथुन अज्ञात चोराने फिर्यादी नामे चंद्रकांत इरन्ना तलारी यांची मोटार सायकल चोरी करून नेली त्यांचे तक्रारीवरून देहूरोड पो.स्टे. गु. रजि.नं. १६७/२०२४ भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता
दाखल गुन्ह्याचे घटनास्थळी व लगतच्या परिसरात सीसीटीव्ही फुटेज नसताना तसेच अज्ञात आरोपी बाबत काही एक माहिती नसताना देहूरोड पोलिस स्टेशनचे तपास पथक गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिस अंमलदार मोहसीन आत्तार व शुभम बावणकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम चोरीची मोटार सायकल घेवुन शिवाजी विद्यालयाजवळ, देहूरोड, पुणे येथे थांबला आहे. सदर ठिकाणी जावुन आरोपी नामे रविंद्र सुरेश सातोळे, वय १९ वर्षे, रा. पाण्याच्या टाकीजवळ, गांधीनगर, देहूरोड, पुणे याला दाखल गुन्ह्यातील मोटार सायकलसह ताब्यात घेवुन पोलिस स्टेशन येथे आणुन त्याची कसुन चौकशी केली असता. त्याने सदरची मोटारसायकल चोरल्याचे कबुल केले यावरुन. आरोपी नामे रविंद्र सुरेश सातोळे याला अटक करून त्याची पोलिस कोठडी रिमांड मिळुन त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याने देहूरोड पो.स्टे. गुरनं. १६६/२०२४ भादंवि कलम ३७९, देहूरोड पो.स्टे. गु. रजि.नं. १७६ / २०२४ भादंवि कलम व पिंपरी पो.स्टे. १३७/२०२४ भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असुन त्याचेकडुन नमुद गुन्ह्यातील ०३ मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. अद्याप पर्यंत एकुण १,६५,०००/- रुपये किंमतीच्या एकुण ०४ मोटार सायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. देहूरोड पोलिस स्टेशनचे ०३ व वाकड पोलिस स्टेशनचा ०१ असे एकुण ०४ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. देहूरोड पोलिस अधिक तपास करीत आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे,अपर पोलिस
आयुक्त वसंत परदेशी,पोलिस उपायुक्त परिमंडळ-२ बापू बांगर, सहा.पोलिस आयुक्त, देहुरोड विभाग घेवारे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय वाघमारे, यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजयकुमार राठोड, पोलिस अंमलदार प्रशांत पवार, बाळासाहेब विधाते, संतोष जाधव, सुनिल यादव, किशोर परदेशी, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष
महाडीक, निलेश जाधव, मोहसिन आत्तार, युवराज माने, शुभम बावनकर, स्वप्नील साबळे, सागर पंडीत यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.




