
अल्पवयीन दुचाकी चोरटे चिखली पोलिसांचे ताब्यात,७ महागड्या दुचाकी केल्या हस्तगत…
चैनीसाठी मोटारसायकल चोरणारे अल्पवयीन चोरटे चिखली पोलिसांच्या ताब्यात…
पिंपरी चिंचवड (महेश बुलाख) – चिखली पोलिस स्टेशन हद्दीतील मोरेवस्ती, साने चौक, टॉवरलाईन, कुदळवाडी, चिखली हा मोठया लोकसंख्येचा व दाट लोकवस्तीचा भाग असुन सदर भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग भाडयाने राहतात, सदरचे कामगार कामावर येण्या-जाण्यासाठी त्यांचे मोटारसायकलचा वापर करीत असतात ब-याचशा भागामध्ये रात्रीचेवेळी मोटारसायकल पार्क करण्यासाठी पार्किंग उपलब्ध नसल्याने ते त्यांच्या मोटारसायकली राहते घराच्या समोरील रस्त्याचे कडेला पार्क करीत असतात. मागील काही दिवसांपासुन चिखली परिसरातुन मोटारसायकली चोरीचे गुन्हयांमध्ये वाढ झाली असुन मोटारसायकल चोरी करणा-या गुन्हेगारांचा शोध घेणे हे चिखली पोलीसांसमोरील एक आव्हान होते.


तेव्हा चिखली पोलिस स्टेशन हद्दीतुन होणा-या मोटारसायकल चोरीच्या गुन्हयांना आळा घालण्याचे दृष्टीने वरीष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी सहा. पोलिस निरीक्षक उद्धव खाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष वाहन चोरी पथक निर्माण करुन त्यांना मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या. सदरच्या पथकाने चिखली पोलिस स्टेशन हद्दीतील घडलेल्या गुन्हयाचे घटनास्थळ परीसरातील सिसिटिव्ही फुटेज मिळवुन त्यानुसार चिखली पोलिस स्टेशन हद्दीमध्ये वेळोवेळी ट्रॅप लावून तसेच पेट्रोलिंग करुन वाहन चोरी करणा-या आरोपींना पकडण्याचे प्रयत्न करण्यात आले.

(दि.१२एप्रिल) रोजी चिखली पोलिस स्टेशन हद्दीमध्ये नमुद पथक हे चिंचेचा मळा, मोरे वस्ती, चिखली परीसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना तिन मुले एकाच मोटर सायकलवरुन परिसरामध्ये संशयीतरित्या फिरत असताना दिसुन आली. पोलिसांना पाहुन ते पळुन जाण्याचा प्रयत्न करत असताना स.पो.नि. खाडे व त्यांचे पथकाने पाठलाग करुन त्यांना अष्टविनायक चौक, मोरे वस्ती, चिखली, पुणे येथून ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यात मिळुन आलेली हिरो होन्डा पेंशन प्रो मोटारसायकल नंबर MH-04-EK-0886 बाबत खात्री केली असता त्याबाबत चिखली पोलिस ठाणे मध्ये गु.रजि.नंबर.१९४/२०२४ भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंद असल्याची खात्री झाली.

मुले अल्पवयीन वाटत असल्याने त्यांच्या पालकांना बोलावुन घेवुन पालकांसमक्ष अल्पवयीन मुलांकडे अधिक विचारपुस केली असता त्यांनी चैनीसाठी मौज-मजेसाठी आणखी सहा मोटारसायकलची चोरी केली असल्याचे सांगुन त्या कुदळवाडी सर्कल ब्रिज च्या खाली असलेल्या स्पाईनरोड मधील मोकळया जागेमध्ये लपवून ठेवल्याचे सांगितले. त्याप्रमाणे त्यांचे पालकांसोबत त्यांना घेऊन कुदळवाडी ब्रिजचे खाली, स्पाईन रोडच्या मधील जागेमध्ये गेलो असता तेथे 1) होन्डा ड्रिम निओ मोटर सायकल नंबर MH-14-EL-9612 2) होन्डा युनिकॉन मोटरसायकल MH-12-JY-8201 3) सुझुकी बर्गमन स्कुटर नंबर MH-04-LA-4920 4) पल्सर कंपनी नंबर MH-14-EX-2280 5) हिरो स्प्लेंडर मोटारसायकल नंबर MH-14-JY-3772, 6) ΜΗ-14-EA-4409 अशा सहा मोटारसायकल मिळून आल्या. राहिलेली पल्सर मोटर सायकल नंबर. MH-14-EX-2280 या मोटारसायकल बाबत ते चोरल्याची कबुली देतात परंतू कोणतीही खात्रीलायक माहिती प्राप्त न झाल्याने त्याबाबत तपास चालु आहे.अशा प्रकारे अल्पवयीन मुलांकडुन चिखली पोलिसांनी सात मोटारसायकल जप्त केलेल्या असुन सहा मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे,अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी,पोलिस उपायुक्त परीमंडळ ३ शिवाजी पवार, सहा पोलिस आयुक्त,एमआयडीसी भोसरी विभाग संदीप हिरे यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक पोलिस स्ऱ्टेशन चिखली ज्ञानेश्वर काटकर यांचे अधिपत्याखाली सपोनि. उध्दव खाडे, पोहवा. सुनिल शिंदे, पोहवा. बाबा गर्जे, पोहवा.चेतन सावंत, पोहवा. भास्कर तारळकर, पोहवा. संदिप मासाळ, पोहवा. दिपक मोहिते, पोहवा. अमोल साकोरे, नापोशि. अमर कांबळे, कबीर पिंजारी,संदीप राठोड पोशि. संतोष सकपाळ, संतोष भोर, सातपुते यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.


