पिंपरी-चिंचवड खंडणी विरोधी पथकाने शिताफीने ४ सराईत गुन्हेगारांना ५ पिस्टल व १० राऊंडसह केली अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

पिंपरी-चिंचवड (सुनील सांबारे) – येणाऱ्या सनांच्या तसेच VVIP दौर्याच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त  विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिचवड पोलीस आयुक्तालया कार्यक्षेत्रामध्ये कोणताही अनुचीत
प्रकार घडू नये याकरीता संशईतांची तपासणी मोहिम राबविणेबाबत गुन्हे शाखांच्या सर्व अधिकारी यांना सराईत गुन्हेगारांचे हालचालीवर लक्ष ठेवणेबाबत सूचना दिलेल्या होत्या
त्यानुसार पोलिस उपायुक्त गुन्हे स्वप्ना गोरे यांचे  शाखेकडील खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलिस निरीक्षक उध्दव खाडे व अंमलदार हे संशयीतांची माहिती तपासनी करीत  असतांना, सहा. पोलिस फौजदार रमेश गायकवाड, पोलिस हवालदार गणेश गिरीगोसावी व विजय
नलगे यांना बातमी मिळाली की, एक इसम जगताप डेअरी चौक, साई मंदीरासमोर, ब्रिजचे खाली. रहाटणी, पुणे येथे थांबलेले असुन त्याचे जवळ पिस्टल सारखे हत्यार आहेत अशी बातमी मिळाल्यानं
खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावून,





अस्लम अहमद शेख रा १६ नंबर, पवार गल्ली नं. ०५. थेरगाव, पुणे यास ताब्यात घेवून त्यांचे ताब्यातुन ०१ देशी बनावटीच पिस्टल, जप्त करून, आरोपी विरुध्द वाकड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ९०७/२०२३. आम अॅक्ट कलम ३(२५). महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दाखल गुन्हयाचे तपासा दरम्यान पिस्टल विक्री करणारे आरोपी ) १)सचिन उत्तम महाजन रा. मु.पो.सुरबड, ता. इंदापूर, जि.पुणे



२) संतोष विनायक नातु रा ४९/३४५ महर्षीनगर झावरे पैलेसजवळ
चितामणी बिल्डींग, स्वारगेट, पुणे



३) राहुल ऊर्फ खड़गणपतरा. विठल मंदीरा जवळ मु. पो. पिंपळगाव ता दौड जि. पुणे यांना अटक करून, पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडे कौशल्यपुर्ण तपास करून, त्यांचे कडून ०४ पिस्टल व १० राऊंड हस्तगत करुन, जप्त करण्यात  आले. नमूद गुन्हयात आता पर्यंत २,५५,०००/- रु. किंमतचे ०५ देशी बनावटीचे पिस्टल व १० जिवंत काडतुसे (राऊंड) जप्त करण्यात आलेली आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे सफौ रमेश गायकवाद है करीत आहेत. आरोपी सचिन महाजन, संतोष नातु व राहुल ढवळे हे पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याचे विरुध्द पुणे शहर, पुणे ग्रामीण व सोलापूर येथे दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण, जबरी चोरी, जबर दुखापत करणे, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहे. आरोपी सचिन महाजन याचेवर मोका अंतर्गत पुणे ग्रामीण येथे कारवाई झालेली आहे. तसेच आरोपी संतोष नातु याचेवर पुणे शहर येथे तडीपार कारवाई करण्यात आली होती.
सदरची कारवाई  विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड,. डॉ. संजय शिंदे पोलिस सह आयुक्त, वसंत परदेशी अपर पोलिस आयुक्त ,स्वप्ना गोरे, पोलिस उप-आयुक्त, गुन्हे, सतिश माने, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली अरविंद पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहा. पोलिस निरीक्षक उध्दव खाडे, सहा पोलिस उपनिरीक्षक रमेश गायकवाड, अमर राऊत तसेच खंडणी विरोधी पथकाचे पोलिस अंमलदार निशांत काळे, गणेश गिरीगोसावी, विजय नलगे,सुनिल कानगुडे, किरण काटकर, प्रदीप गोडावे, आशिष बोटक रमेश मावसकर, प्रदीप गायकवाड,शैलेश मगर, चंद्रकांत जाधव, ज्ञानेश्वर कुन्हाडे, सुधीर ढोक प्रदीप गुट्टे व भरत गाडे यांचे पथकाने केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!