
घुसकोरी करुन भारतात आलेल्या ४ बांग्लादेशींना सांगवी पोलिसांनी घेतले ताब्यात…
कुठलाही भारताचा रहीवासी परवाना किंवा पुरावा नसतांना घुसखोरी करुन भारतात येऊन पिंपरी चिंचवड येथे वास्तव्य करणाऱ्यांना सांगवी पोलिसांनी केली अटक…
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – सांगवी पोलिसांनी कौशल्यपूर्ण तापास, तांत्रिक विश्लेषन आणि मिळालेली गोपनीय माहिती यांच्या आधारावर बांगलादेशी घूसखोरांना शिताफीने अटक करून ते बनावट कागदपत्रांच्या आधारे घुसखोरीच्या मार्गाने भारतात येऊन भारतामध्ये अवैधरित्या व बेकायदेशीर राहत असल्याचे उघडकीस आले आहे. या मध्ये ४ बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्यात आली आहे.


या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार (दि.३१जुलै) रोजी सायंकाळी ०५.०० वा.च्या सुमारास सागोर सुशांती बिस्वास, (वय २६ वर्षे), रा.फ्लॅट नं. ८/१/६, केशवनगर, ब्लॉक सेक्टर, पिंपळे सौदागर, पिंपरी चिंचवड हा त्याच्या पी.सी.सी. च्या व्हेरीफिकेशनसाठी सांगवी पोलिस स्टेशन येथे आला असता, त्याने सादर केलेल्या कागदपत्राबाबत सांगवी पोलिस स्टेशन येथे पासपोर्ट व चारित्र्य पडताळणीचे कामकाज पाहणारे पो.ना. जितेंद्र बावरकर यांना संशय आल्याने त्यांनी कागदपत्रातील नमूद पत्त्यावर जाऊन पडताळणी केली असता सागोर सुशांतो बिस्वास हा त्या पत्त्यावर राहत नसल्याचे निदर्शनास आले. तसेच अधिक चौकशीअंती त्याने सादर केलेला जन्माचा दाखला व ट्रान्सफर सर्टिफिकेट सुध्दा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ए.टी.बी. च्या स्टाफच्या मदतीने सदर इसमाकडे आणखी चौकशी करून पुनावळे परिसरातून ०१ व पुणे कॅम्प परिसरातून ०२ बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत ते गेल्या काही वर्षापासुन कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय किंवा भारतामध्ये राहण्याकरीता लागणाऱ्या वैध व्हिसाशिवाय, भारत बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगी शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारत देशामध्ये प्रवेश करून भारतामध्ये अवैधरित्या व बेकायदेशीर राहत असल्याचे उघडकीस आले. तसेच त्यांतील दोघांनी बनावट जन्मदाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून त्या आधारे पासपोर्ट सुध्दा काढल्याचे उघडकीस आले. म्हणून ०४ बांगलादेशी घुसखोरांविरोधात सांगवी पोलिस स्टेशन येथे गु.नो.क्र. ३१५/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (४), ३३६(२), ३३६(३). ३४०(२), ३(५) सह परकीय नागरिक कायदा १९४६ चे कलम १४ (A) (b), १४(B) सह पारपत्र अधिनियम १९६७ चे कलम १२ सह पारपत्र (भारतात प्रवेश) नियम १९५० चे कलम ३ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला. सदर गुन्हयात

सांगवी पोलीसांनी खालील ०४ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे.या मध्ये १) सागोर सुशांतो बिस्वास, (वय २६ वर्षे), रा. ग्राम दोरीशोलोई, पो.आरपारा, पो.स्टे. शालिखा, जि. मागुरा, विभाग उघडना, बांगलादेश,२) देब्रोतो वोबेन बिस्वास, (वय २६ वर्षे), सध्या रा.हॉटेल संदिप, साई मिलेनिअम शॉपिंग मॉल, पुनावळे,पुणे. मुळ पत्ता दोरीशोलोई, पो.आरपारा, पो.स्टे. शालिखा, जि.मागुरा, विभाग खुलना, बांगलादेश, ३) जॉनी वोबेन बिस्वास, (वय २७ वर्षे), सध्या रा. हिल टॉप लिकर देशी दारू दुकानाचे वरील मजल्यावर, गार्डन वडापावचे बाजूला, ९४६, बुटी स्ट्रीट, कॅम्प, पुणे. मुळपत्ता दोरीशोलोई, पो. आरपारा, पो.स्टे. शालिखा, जि. मागुरा, विभाग खुलना, बांगलादेश,४) रोनी अनूप सिकदर, (वय २८ वर्षे), रा.हिल टॉप लिकर देशी दारू दुकानाचे वरील मजल्यावर, गार्डन वडापावचे बाजूला, ९४६, बुटी स्ट्रीट, कॅम्प, पुणे, मुळ पत्ता बाहिर नोगोर, पो. भिमपुर, जि. फरिदपुर, बांगलादेश. सदर गुन्हयाचा पुढील तपास हे पोलीस उप निरीक्षक किरण कणसे हे करीत आहे. पो.ना. जितेंद्र बावस्कर यांच्या सतर्कतेमुळे ०४ बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्यात यश आले.

सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उप आयुक्त, परि.१ स्वप्ना गोरे, पोलिस उप आयुक्त, परि.३ तथा नियंत्रण अधिकारी, ए.टी.बी. डॉ. शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलिस स्टेशनचे व.पो.नि. महेश बनसोडे, पो.उ.नि. किरण कणसे, पो.हवा. तुषार साळुंखे, पो.हवा.विजय मोरे, पो.ना.जितेंद्र बावस्कर तसेच दहशतवाद विरोधी शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी केली.


