अवैधपणे गॅसची चोरी करतांना,आग लागण्यास कारणीभुत असणार्यास वाकड पोलिसांनी केली अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

वाकड(पिंपरी-चिंचवड) महेश बुलाख ः सवीस्तर व्रुत्त असे की  दि.०८/१०/२०२३ रोजी ११.२० वाजण्याचे सुमारास, जे.एस. पी. एम. कॉलेज परिसर, ताथवडे, पुणे येथे येथे मोठ्या प्रमाणात आग लागलेली असल्याबाबत मिळालेल्या बातमीवरुन वाकड पोलिस
स्टेशनचे अधिकारी, अंमलदार यांनी सदर ठिकाणी तात्काळ पोहचुन महसुल खात्याकडील अधिकारी, व एम.एन.जी.एल, फायर ब्रिगेड यांना कळवुन योग्य ती उपाययोजना केली, त्यामध्ये तपास केला असता सदर ठिकाणी आग ही गॅसचे टँकर गाडी क्र GJ 16 AW 9045 मधुन नोजल पाईप द्वारे गॅस चोरुन व्यावसाईक गॅस टाक्या भरण्याचे काम चालु असताना गॅस लिकेज झाल्याने स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे निष्पन्न झाले सदर आगीमध्ये जेएसपीएम कॉलेज आवारात पार्क केलेल्या ब्लॉसम
स्कुलचे तीन स्कुल बस, गॅसचा टँकर, गॅस चोरुन नेण्यासाठी सिलींडर असलेला टेम्पो इत्यादी जळुन नुकसान झाल्याने आरोपी यांनी संगणमत करुन प्रोपीलीन गॅस या जिवनावश्यक वस्तुची बेकायदेशीर पणे व स्वताचे आर्थिक फायद्याकरीता चोरी करुन त्याची काळ्या बाजारात वाढीव दरात विक्री करण्यासाठी व्यावसाईक गॅस सिलेंडर मध्ये गॅस भरताना केलेल्या कृती मुळे मोठ्या प्रमाणात आग लागुन स्फोट होऊन मानवी जिवितास धोका निर्माण केला तसेच मालमत्तेची हानी केली. तसेच सदरचे
काम गैर कायदेशिर असल्याची माहित असतांना सुध्दा पैश्याचे मोबदल्यात जागा मालक  चंद्रकांत महादेव सपकाळ याने आपली जागा उपलब्ध करुन दिली म्हणुन सर्व आरोपींविरुध्द वाकड पोलिस स्टेशनचे पोउनि. भारत माने यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्याने वाकड पो. स्टे गुरंन. ९८०/२०२३ भा.द.वि. कलम ३७९,४०७,२८५,३३६,४२७,३४ व जिवनावश्यक वस्तु अधिनीयम कलम ३,७ स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ३,४ प्रमाणे कायदेशिर तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर गुन्हयातील आरोपी यांना वाकड पोलिसांनी तात्काळ निष्पन्न करुन आरोपी

१) महिपाल चौधरी, रा. साई पॅराडाईज सोसा., पुनावळे





२) राहुलकुमार राजदेवराम, रा. बेलठीका नगर, थेरगाव,पुणे,



३) चंद्रकांत महादेव सपकाळ रा. जे. एस. पी. एम कॉलेज जवळ ताथवडे पुणे



यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्याचेविरुध्द अटक कारवाई चालु आहे. तसेच एक आरोपी फरार असुन त्याचा शोध चालु
आहे. गुन्हयाचा सखोल तपास करुन आणखी इतर कोणाचा सहभाग निष्पन्न होत असल्यास त्यांना अटक करुन त्याप्रमाणे पुढील कायदेशिर कारवाई वाकड पोलिस करीत आहेत.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!