शुल्लक कारणावरुन जिवलग मित्रानेच केला मित्राचा घात,बीड येथुन केली अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

 वाकड(पिंपरी-चिंचवड) महेश बुलाख – 

सवीस्तर व्रुत्त असे की थेरगाव परीसरातील इसम सुरज ऊर्फे जंजीर कांबळे वय ३० वर्षे रा. जगतापनगर लेन नं ५ थेरगांव पुणे हा हरवला  असलेबाबत त्याची पत्नी आरती सुरज कांबळे यांचे तक्रारीवरुन वाकड पोलिस ठाणे येथे मनुष्य मिसिंग क्र.२८४/२०२३ प्रमाणे दि. ०७/१०/२०२३ रोजी मिसिंग दाखल करण्यात आली.
सदरचा इसम मिसींग झाले पासुन त्याचे बाबत कोणतीही माहीती मिळत नव्हती. दि. ११/१०/२०२३ रोजी आरती सुरज कांबळे यांनी दिलेल्या पुरवणी जबाबात मिसींग इसम सुरज कांबळे हे त्यांचे मित्र पंकज पाचपिंडे यांचे सोबत दारु पिण्यासाठी गेले होते त्यानंतर ते परत घरी आले नसलेबाबत माहीती प्राप्त झाली. पंकज पाचपिंडे हा मिसींग तक्रार दाखल झालेनंतर तेव्त्याहापासुन त्याचा फोन बंद
करुन कोठेतरी निघुन गेला असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सदर मिसींग मध्ये काहीतरी गंभीर घटना घडली असावी हे ओळखून
गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाकड पोलिस ठाणे यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकाकील सपोनि
संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण यांना सोबतचे पोलिस अंमलदारांसोबत मिसींग व्यक्तीचा सर्वोतोपरी शोध घेणेबाबत आदेश दिले.त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण विभागातील अधिकारी व अंमलदार मिसींग व्यक्तीचा व त्याचे सोबत असणारे पंकज पाचपडे
याचा शोध घेत असताना अशी माहीती प्राप्त झाली की, मिसींग इसम, पंकज पाचपडे व त्यांचा मित्र अमरदिप ऊर्फ लखन जोगदंड
असे दि.०५/१०/२०२३ रोजी दारु पिणेसाठी थेरगाव मध्ये बसले होते. त्यानंतर सुरज कांबळे हा घरी परत आलेला नाही. पंकज
पाचपिंडे व अमरदिप ऊर्फे लखन जोगदंड हे वाकड पोलिस स्टेशन येथे मिसींग दाखल झालेनंतर कोठेतरी निघुन गेले असल्याचे
माहीती प्राप्त झाली. त्यामुळे तपास पथकाने तांत्रीक विश्लेषण व पारंपारीक तपास पध्दतीने तपास सुरु केला असता माहीती भेटली
की,





१) पंकज रतन पाचपिडे वय २८ वर्ष रा. जय मल्हार कॉलनी नं ५ थेरगांव पुणे



२) अमरदिप ऊर्फ लखन दशरथ जोगदंड वय ३३ वर्षे रा. म्हातोबा बारणे यांची खोली, चांदनी चौक, थेरगाव गावठाण, थेरगांव, पुणे, मुळपत्ता मु.पो आंबेजोगाई, साठे नगर, परळी वेस्ट, बीड



हे बिड जिल्हयात लपुन बसले आहेत. त्यामुळे वरिष्ठांचे परवानगीने तात्काळ एक पथक बिडला रवाना करुन दोन्ही संशयीत घेवून पोलिस स्टेशन येथे आणुन तपास केला असता त्यांनी सांगीतले की, दि. ०५/१०/२०२३ रोजी सुरज पंकज पाचपंडे व अमरदिप ऊर्फ लखन जोगदंड असे तिघेजण पंकज पाचपिंडे राहत असलेल्या जय मल्हार कॉलनी नं.०५ थेरगाव पुणे येथील घरात दारु पित बसले असताना, सुरज कांबळे याने आई बहीणीवरुन घाणेरडया शिवीगाळ केल्याने रागाचे भरात पंकज पाचपडे व अमरदिप ऊर्फ लखन जोगदंड यांनी चाकुने सुरज कांबळे याचे गळयावर वार करून त्याचा खून केला. त्यानंतर आरोपी पंकज पाचपिंडे चालवित असणारा तिनचाकी टेम्पो मध्ये सुरज कांबळे याची एका गोधडीत गुंडाळून बावधन येथील गायकवाड वस्ती मधील हायवे खालील नाल्यात टाकुन दिली. त्यानंतर ते दोघे काही घडले नाही अशा अविभावात दोन दिवस आपले नियमीत काम करीत होते.
सुरज कांबळे याचे पत्निने दि. ०७/१०/२०२३ रोजी मिसींग तक्रार दाखल केले नंतर पंकज पाचपिंडे हा सुरज कांबळे याचे पत्नीस घरी जावुन भेटुन सुरज हा दि. ०५/१०/२०२३ रोजी त्याचे सोबत दारु पित होता. परंतु दारु पिल्यानंतर  रात्री ०१.०० वा सुमा. तो घरी परत गेला आहे अशी हकीकत सांगीतली. त्यामुळे सुरवातीला आरती कांबळे यांना पंकज पाचपिंडे याबाबत कोणतीही शंका निर्माण झाली नाही. परंतु पंकज पाचपिंडे व अमरदिप ऊर्फ लखन जोगदंड यांना पोलिस तपासात आपले पर्यंत पोहोचणार याची भिती निर्माण झालेने, ते दि.०८/१०/२०२३ रोजी पासुनच पुण्यातुन निघुन गेले होते. मनुष्य मिसींगचे झाले तपासावरुन तपासी अधिकारी पोउपनि सचिन चव्हाण यांचे फिर्यादीवरुन वाकड पोलिस स्टेशन येथे
गु.र.नं. १००८ / २०२३ भादविक ३०२,२०१,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला. सदर गुन्हयात दोन्ही आरोपींना अटक करुन
त्यांचेकडे विश्वासात घेवून चौकशी करुन आरोपीनी मयत सुरज कांबळे यांची बॉडी ज्या ठिकाणी टाकली होती ते ठिकाण शोधुन
बॉडी ताब्यात घेण्यात  आली आहे. सदर मयतावर ससुन हॉस्पीटल पुणे येथे पोस्टमार्टम करण्यात  आले असुन पुढील तपास वाकड
पोलिस करीत आहे.
एकंदरीत तीन चांगले मिञ दारु पित बसले असताना शिवीगाळ केलेचे किरकोळ कारणावरुन त्यांचेत वाद होवुन त्यांनी मिञाचा खून केला आहे. तसेच खुन केले नंतरही खुन लपविणेसाठी त्याची बॉडी नाल्यात टाकुन आपले नियमीत काम करीत बसला तसेच पोलिसांना आपले बाबत माहीती मिळेल याची जाणीव झाल्यावर फोन बंद करुन अंबाजोगाई जि.बिड येथे जावून आपले अस्तित्व लपवुन बसलेल्या दोन आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपींना दिनांक २४/१०/२०२३ रोजी पर्यंत
पोलिस कस्टडी प्राप्त असून तपास चालू आहे.
सदरची कारवाई  विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड,
डॉ. संजय शिंदे सह पोलिस आयुक्त,  वसंत परदेशी, अपर पोलिस आयुक्त,  डॉ. काकासाहेब डोळे पोलिस उप आयुक्त, परि २ पिंपरी
चिंचवड,  डॉ. विशाल हिरे, सहा. पोलिस आयुक्त , वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली  गणेश जवादवाड वरिष्ठ पोलिस निरीक्षक,  विठ्ठल साळुंखे पोलिस निरीक्षक (गुन्हे), सपोनि संतोष पाटील, पोउपनि. सचिन चव्हाण, सफौ. बाबाजान इनामदार, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा दिपक सावळे, पोहवा. अतिश जाधव, प्रमोद कदम, पोना. प्रशांत गिलबीले, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, राम तळपे, पोशि. अजय फल्ले, भास्कर भारती,स्वप्निल लोखंडे, सौदागर लामतुरे,  कोतेय खराडे, विनायक घारगे,  रमेश खेडकर, . सागर पंडीत(परि ०२ कार्यालय) यांनी मिळुन केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!