पोलिस उप-निरीक्षकाने जिंकले दिड कोटीचे बक्षीस

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

पिंपरी : क्रिकेट म्हनजे  सर्वांच्या आवडीचा खेळ, काही जण ग्राऊंडवर जाऊन  खेळतात तर काही जण मोबाईलवर खेळतात. तसे गेम देखील मोबाईलमध्ये उपलब्ध झाले आहेत. याच
मोबाईलवरून गेम खेळल्यामुळे पिंपरी-चिंचवड येथील एका पोलिस उपनिरीक्षकाला क्रिकेटच्या ड्रीम ११ मध्ये तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस लागले आहे. त्यामुळे त्यांचे खऱ्या अर्थाने स्वप्नच पुर्ण झाले आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात काम करत असलेले
सोमनाथ झेंडे, असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. या दीड कोटीमुळे त्यांचे नशीब पालटले आहे. सध्या क्रिकेट विश्वचषक सामने सुरू आहेत. त्यांनी बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या सामन्यावर टीम लावली होती. यात त्यांना बक्षीस लागल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. गेल्या तीन चार महिन्यांपासून त्यांनी ड्रीम ११ यावर क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार त्यांनी सामन्यावर टीम लावली होती. मात्र, त्यांना आता यात दीड कोटींचे बक्षीस मिळाले आहे. पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी यांनी असे
सांगितले की, सुरुवातीला माझा यावर विश्वासच बसला नाही. पण, नंतर याचे दोन-दोन लाख रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हे खरे असल्याचे त्यांनी सांगितले.  सोमनाथ झेंडे यांना बक्षीस लागल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यांच्या कुटुंबात देखील आनंदाचे वातावरण आहे. मात्र, तरीही असे खेळ स्वत:च्या जबाबदारीवर खेळावे जेणे करून आपल्याला कोणत्याही प्रकारचा भुर्दंड सहन करावा लागणार नाही. मात्र, झेंडे
यांना लागलेले बक्षीस हे त्यांचे नशीब बदलणारे आहे असेच म्हणावे लागेल.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!