पोलिसांचे आरोग्य- कर्तव्यावर असतांना महीलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

महीलांचे आरोग्य -मोलाचा सल्ला (डॅा जया निलेश तुळस्कर(कोरे)
जेव्हा सर्व मंडळी सण उत्सव साजरा करत जत्रेचा आनंद घेत असतात त्यावेळी आपली कामगिरी बजावत ड्युटीवर तैनात असतो तो आपला पोलिसवर्ग .त्यातल्या त्यात महिला पोलिस सर्व समाजाला सुरक्षितता देता देता स्वतःच्या कुटुंबाचीही जबाबदारी सांभाळत असते…
अशा वेळी जगतगुरु तुकाराम महाराजांच्या ओळी आठवतात
‘पाण्यातला मासा झोप घेतो कैसा | जावे त्याच्या वंश तेव्हा कळे||
साखरेची चव मुंगी कैसी चाखे |जावे त्याच्या वंशी तेव्हा कळे ||

महिला पोलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा वरवर रुबाब हा खूपच छान वाटतो .पण दिवस रात्र न बघता फक्त समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाची जबादारी ती सांभाळत असते. पण मात्र हे सर्व करताना तिचे स्वतःचे स्वास्थ्य सदैव दुर्लक्षित राहते .
नाकाबंदी ,नवरात्र ,गणोशोत्सव तसेच जत्रा, यात्रा, निवडणुकीत लागणारा बंदोबस्त असो,वाहतूक नियंत्रण व कुठल्याही सण उत्सवामध्ये ऑफिसबाहेर ड्युटी असल्यास आठ आठ दहा दहा तास रस्त्यावर उभे राहावे लागते .कधी एखाद्या वेळेस सुटी असल्यास कौटुंबिक सामाजिक जबाबदाऱ्या लग्न,मुंजी वाढदिवसांना हजेरी लावावी लागते.
मासिक पाळी,गरोदरपण,प्रसूती आणि रजोनिवृत्ती ह्या चार अवस्था स्त्रियांना पुरुषांपेक्षा वेगळ्या बनवतात .ह्या अवस्थांमधील आजार हे फक्त स्त्रियांशी निगडित असल्यामुळे त्यांचा अधिक विचार करणे गरजेचे आहे.
मासिक पाळीत असताना पोटात व पाठीत वेदना ,अशक्तपणा हा सामान्यपणे होणारा शारीरिक त्रास ,ड्युटीमुळे व सतत उभे राहिल्यामुळे तो त्रास वाढू शकतो. मासिक पाळी सुरु असताना ऑफिसबाहेर ड्युटी असल्यास पॅड बदलण्यासाठी सुद्धा व्यवस्थित जागा उपलब्ध नसतात ,त्यामुळे बरेच तास तेच पॅड वापरल्यामुळे पाणी पांढरं,लघवीत जळजळ असे मूत्रमार्ग तसेच जननेंद्रियाच्या विकार,त्वचाविकार होऊ शकतात गरजेचे आहे .प्रेग्नन्सीमध्ये होणारा मानसिक तणाव ,शारीरिक तणाव संतुलित आहाराचा अभाव तसेच झोपेची कमतरता यासर्वांमुळे मातेवर तसेच गर्भातल्या बाळावरदेखील परिणाम होऊ शकतो बाळ कमी वजनाचे होऊ शकते,बाळाचा अकाली जन्म देखील होऊ शकतो. मातेला गर्भावस्थेत रक्तदाब व मधुमेह होण्याची शक्यता वाढते.
कमी ताण घेणे- तज्ञांच्या मते महिला अधिक विचार आणि ताण घेतात. याचा परिणाम थेट त्यांच्या आरोग्यावर होत महिला पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी असताना आणि जबाबदाऱ्या यामुळे ताण येणं साहजिक आहे. यामुळे तुम्ही तणावात असाल तर त्या विषयावर तुमचा जोडीदार, कुटंब किंवा जवळच्या मैत्रीणीसोबत चर्चा करा आणि मनं मोकळं करा. तणाव घेतल्याने वंध्यत्व, नैराश्य आणि हृदयासंबंधीत समस्या निर्माण होतात. तणाव दूर करण्यासाठी ध्यान किंवा योगा करा. तसचं म्युझिक थेरपी म्हणजेच तुमची आवडती गाणी ऐकून तुम्ही ताण कमी करू शकता.
अधिक पाणी पिणे- कामाच्या गडबडीमध्ये आपण बऱ्याचदा कमी पाणी पितो . सुटीसाठी घराबाहेर निघताना स्वतःची पाण्याची बाटली सदैव सोबत असू द्या . यासाठीच दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी प्या. यामुळे तुमच्या पोटाच्या समस्या तर दूर होतील. शिवाय त्वचा तजेलदार राहण्यास मदत होईल,





. ७-८ तासांची झोप घ्या– पुरेशी झोप घेणं गरजेच आहे. ७-८ तासं झोप घेतल्यास शरीर आणि मेंदू पुन्हा रिसेट होण्यास मदत होते. नियमित चाला- महिला त्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना स्वत:च्या फिटनेसकडे दूर्लक्ष करतात. यामुळेत सांधेदुखी, कंबरदुखी किंवा वजन वाढल्याने महिलांमध्ये इतर आजार वाढण्याची शक्यता असते.फिट राहण्यासाठी जिममध्ये जाण्याची आवश्यकता नाही. यासाठी दररोज किमान अर्धा तास वॉक करा. सकाळी किंवा रात्री जेवल्यानंतर वॉक करणं फायदेशीर ठरू शकतं. संतुलित आहार -विटामिन आणि मिनरल्स असलेला आहार घ्या- पुरुषांच्या तुलनेत महिलामध्ये विटामिन आणि मिनरल्सची कमतरता जाणवते. यासाठीच आहारात विटामिन आणि मिनरल्सचा समावेश असेल याकडे लक्ष द्या. कॅल्शियम, विटामिन डी, फॉलेट, आयरन, विटामिन सी, विटामिन बी १२ आणि मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. सुका मेवा मध्ये भरपूरप्रमाणात प्रथिने तसेच खजिने असतात .एका छोट्या डब्यात सुका मेवा आपण आपल्या बॅग मध्ये ठेवू शकतो .जेणेकरून मध्ये खाता येईल .



वर्षातून एकदा हेल्थ चेकअप- तज्ञांच्या सल्ल्यानुसार महिलांनी वर्षातून एकदा डॉक्टरांकडू योग्य तपासण्या करून घेणं गरजेचं आहे. ज्यात रक्तदाब ,मधुमेहाची तपासणी थायरॉईड ची तपासणी तसेच गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इतर तपासण्या करायला हव्यात .
पॅप्स स्मिअर तपासणी – हि तपासणी कुठल्याही सरकारी इस्पितळात मोफत व खासगी स्त्रीरोगतज्ज्ञांकडे केली जाते.ज्यात गर्भाशयाच्या मुखावरून एका छोट्या लाकडी पट्टीद्वारे किंवा ब्रशच्या साहाय्याने पेशी घेतल्या जातात व त्या दुर्बिणीखाली तपासल्या जातात.त्या पेशींमध्ये कॅन्सरपुर्व बदल तर नाहीत ना हे पहिल्या जात. खास करून 30 आणि त्याहून पुढील वयोगटातील महिलांनी दर ३ वर्षातून एकदा सर्वायकल कॅन्सरच्या तपासणीसाठी पॅप्स टेस्ट करून घ्यावी. ३० ते ६५ वयोगटाली महिलांनी किमान ५ वर्षातून एकदा तरी पॅप्स टेस्ट आणि एचपीव्ही टेस्ट करणं गरजेचं आहे.
स्वयं स्तनतपासणी -दर महिन्यातून एकदा प्रत्येक महिलेने आरशासमोर स्तनांची तपासणी कुठली गांठ,दोन्ही स्तनांच्या आकारामध्ये बदल ,स्तनागराच्या आकारामध्ये बदल किंवा कुठला स्त्राव येतोय का(स्तनाच्या कर्करोगामुळे होणारे बदल ) हे सर्व तपासायला हवे व दर वर्षातून किमान एकदा डॉक्टरांकडून स्तनाची तपासणी करून घ्यायला हवी .
महिन्यातून एक ब्रेक घ्या- कामातून आणि सर्व जबाबदाऱ्यांमधून महिन्यातून किमान १ दिवस स्वत:साठी वेळ द्या. या दिवशी मैत्रिणींसोबत किंवा एखादा सिनेमा पाहायला जा. पार्लरमध्ये जाऊन फेशियल, हेड मसाज अशा पद्धतीने थोडं रिलॅक्स होणं गरजेचं आहे. यामुळे तुम्हाला रिफ्रेश वाट्टेल.



आनंदी रहा- सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आनंदी आणि कायम पॉझिटिव्ह रहा. कोणतही समस्या किंवा त्रास असेल तर कुटुंबासोबत त्यावर चर्चा करा. कुटुंबासोबत आनंद साजरा करा.
कौटुंबिक साथ- सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंटुंबाची साथ होय,घरच्या नवरा तसेच सासरे मंडीळीनी महिला पोलिसांच्या कामाचं स्वरूप जाणून घेणं खूप महत्वाचं आहे

सदरचा लेख हा महीला पोलिसांचे आरोग्य या मथळ्याखाली प्रसिध्द केला आहे,संबंधीत लेखीका या स्वतहा उच्तशिक्षित  स्त्री रोग तज्ञ असुन त्या नेहमीच असे लेख लिहीतात…

डॉ जया नि. तुळसकर(कोरे)
स्त्रीरोग तज्ज्ञ ,तुळसकर हॉस्पिटल
हिंगणघाट .
सदस्यI
अमोग्स हाय रिस्क प्रेग्नन्सी कमिटी





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!