जामीनाच्या पैशाची जुळवाजुळव करण्याकरीता दरोड्याच्या तयारीत असतांना शस्त्रासह ७ अटकेत….
भारती विद्यापीठ, पुणे शहर(सायली भोंडे) – सवीस्तर व्रुत्त असे की भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हददीत त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ पुणे येथे दिवाळी सणानिमीत्त सोने खरेदीकरीता नागरिकांची गर्दी होत असल्याने सोनार व्यावसायीक सोन्याचा स्टॉक त्यांचे दुकानात ठेवत असतात. सदर परिसराची रेकी करुन सिंहगड रोड पोलिस स्टेशन व भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन रेकॉर्डवरील गुन्हेगार सराफाला लुटणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळाली त्याप्रमाणे भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांचे मार्गदर्शनाने सापळा रचला असता गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार तीन मोटरसायकलवर ट्रीपल सीट बसून संशयीत सराफ पट्ट्यातुन फिरताना दिसले. त्यावेळी त्यांना राजे चौक येथे लागलीच ताब्यात घेतले व जागीच त्यांची झडती घेतली असता रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे
१) राधेमोहन (मुन्ना) सिताराम पिसे, वय १९ वर्षे,धंदा बेरोजगार, रा. प्रेमा कॉलनी, लेन नंबर ०२, यशोदिप चौक, वारजे माळवाडी, पुणे
२) समीर ज्ञानेश्वर मारणे, वय २० वर्षे, धंदा नोकरी, रा. मारणे हाईटस, फ्लॅट नंबर ४, किरण मेडीकल जवळील, लेन नंबर ०४, नन्हे गाव, पुणे मुळ गाव मु.पो भोडे, मुठा, ता. मुळशी, पुणे
यांचे ताव्यात पाच राऊंडसह दोन लोडेड पिस्टल मिळाल्या त्यामुळे उर्वरीत आरोपी नामे
३) अर्जुन मोहन वेलदरे, वय २०वर्षे, रा. विनायक ज्वेलर्स समोरील इमारतीमध्ये ४ था मजला, गणपती मंदीराचे पाठीमागे, आंवेगाव वु,
पुणे
४) तुपार दिलीप माने, वय १९ वर्षे, रा. हरणाई कॉम्पलेक्स, फ्लॅट नंबर ४, भेंडी चौक, आंवेगाव वु, पुणे
५) यश मनोज लोहकरे, वय १९ वर्षे, धंदा बरोजगार, रा. मातोश्री आंगण, तिसरा मजला, राम मंदीराजवळ, आंबेगाव पठार, पुणे
६) अनिल दिलीप माने, वय २० वर्षे, रा. हरणाई कॉम्पलेक्स,
फ्लॅट नंबर ४, भेंडी चौक, आंबेगाव बु, पुणे
७) ओकार ऊर्फे मयुर दादासाहेब माने, वय २० वर्षे, रा. शिवरत्न बिल्डींग, गायमुख चौक, आंबेगाव बु, पुणे
व दोन विधीसंघर्पग्रस्त बालक यांचेकडे चौकशी केली असता आरोपी नामे १) राधेमोहन ( मुन्ना) सिताराम पिसे, वय १९ वर्षे, धंदा बेरोजगार, रा. प्रेमा कॉलनी, लेन नंबर ०२, यशोदिप चौक, वारजे माळवाडी, पुणे याने त्रिमूर्ती चौकातील सराफावर दरोडा टाकणार होतो याची कबुली दिली व मागील महिन्यात त्याचा गॅग लीडर ओकार लोहकरे याचे खूनाचा बदला घेण्यासाठी पिस्टल आणले असून त्याचे गुन्हयामध्ये जामीनाचा खर्चाची जुळवाजुळव करण्यासाठी सराफाच्या दुकानात साथीदारासह चोरी करणार होतो अशी कबुली दिली असुन नमुद आरोपी याचे ताब्यातून दोन पिस्टल ०५ राऊंडसह, ७ मोबाईल फोन, व ३ मोटर सायकल असा एकुण ०३,९८,०१० रु किमंतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे त्यावरुन पोलिस अंमलदार चेतन गोरे यांनी दिल्या फिर्यादवरुन भारती विद्यापीठ पो स्टे ७२३ / २०२३ भादंवि कलम ३९९,४०२, महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ ( १ ) (३) १३५ व आर्म अॅक्ट कलम ३ सह २५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे व आरोपीतास अटक करण्यात आले असून मा न्यायालयाने त्यांना
दि. ११/११/२०२३ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे.
सदर गुन्हयाच्या तपासामध्ये रितेश कुमार पोलिस आयुक्त पुणे शहर, संदीप कर्णीक सह-आयुक्त, पुणे शहर, प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, स्मार्तना पाटील सारे, पोलिस उप आयुक्त सो परिमंडळ ०२ पुणे शहर, नारायण शिरगावकर, सहा. पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली विनायक गायकवाड वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भारती विद्यापीठ पो स्टे, विजय पुराणीक, पोलिस निरीक्षक गुन्हे भारती विद्यापीठ पो स्टे गिरीश दिघावकर पोलिस निरीक्षक (गुन्हे), सपोनि अमोल रसाळ, पोउनि धीरज गुप्ता, पोलिस अंमलदार मंगेश पवार, हर्पल शिंदे, अभिजीत जाधव, धनाजी धोत्रे, सचिन गाडे,
निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, आशिप गायकवाड, सचिन सरपाले, चेतन गोरे, निलेश जमदाडे, शैलेंद्र साठे, महेश बारावकर, अवधूत जमदाडे, निलेश ढमढेरे, मितेश चोरमोले, राहूल तांबे, विक्रम
सावंत, यांचे पथकाने केलेली आहे.