कॅालगर्लला भेटनं आजोबांना पडलं महागात,लावला ३० लाखाचा चुना…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पुणे – ७४ वर्षीय आजोबांना कॉल गर्लची भेट घेणे चांगलंच महागात पडलं आहे. कॉल गर्लच्या भेटीमुळे आजोबांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. एका चुकीमुळे आजोबांना आर्थिक आणि मानसिक मनस्ताप सहन करावा लागला आहे. मात्र अखेर आजोबांना पोलिसांत धाव घेतली आणि यातून
आपली सुटका करून घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका
महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून २ जणांना
अटक केली आहे.

ज्योती बनसोडे





रामचंद्र बापू कोरडे



या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



सवीस्तर व्रुत्त असे की  काही महिन्यांपूर्वी आजोबांची एका कॉल गर्लची भेट घेतली होती. त्यानंतर फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देत आरोपींनी ३ महिन्यात आजोबांकडून ३० लाख रुपये उकळले. प्रतिष्ठा जाईल या भीतीने आजोबांनी देखील पैसे दिले. पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातून हा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने जुलैमध्ये ज्योतीमार्फत एका कॉल गर्लची भेट घेतली होती. त्यानंतर फिर्यादी यांना ज्योतीचा फोन आला. तिने सांगितलं की पोलिसांनी त्या कॉल गर्लला मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केली. तिच्या मोबाईलमध्ये तुमचं कॉल रेकॉर्डिंग आहे, अशी ज्योतीने बतावणी केली. पोलिस या गुन्ह्यात तुमचेही नाव टाकतील, अशी भीती दाखवून हा विषय संपवण्यासाठी ज्योतीने पैशांची मागणी केली.आपली प्रतिष्ठा जाईल या भीतीने आजोबांनी  आरोपींना रोख आणि धनादेशाद्वारे वेळोवेळी ३० लाख ३० हजार रुपये दिले. परंतु आरोपींचे दरमहा एक लाख रुपये न दिल्यास पोलिस कारवाई करतील, अशी धमकी दिली. अखेर सततच्या त्रासाला कंटाळून आजोबांनी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांना याबाबत कारवाई केली असून पुढील तपास मार्केटयार्ड पोलिस करीत  आहेत





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!