बनावट कागदपत्रांच्या आधारे लोकांचे चारचाकी वाहनांची विक्री करणारे स्वारगेट पोलिसांचे ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

बनावट कागदपत्रांचे आधारे चारचाकी गाडयांची विक्री करुन लोकांची फसवणुक करणाऱ्या चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद….

पुणे(सायली भोंडे) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,स्वारगेट पोलिस स्टेशन येथे फिर्यादी नामे गणेश बबन जगदाळे वय २८ वर्षे, धंदा ड्रायव्हर ,रा.खासगाव ता. परांडा जि.धाराधिव यांनी तक्रार दिली की दिनांक २५/०२/२०२४ रोजी संध्या.०७/३० वा.चे सुमारास स्वारगेट बस स्थानक जवळ इसम नामे आयुष कुलथे याने त्याचे नाव नवनाथ खजिने असे खोटे सांगून व त्याच नावाचे व गाडीचे खोटे व बनावट आधार कार्ड, आर.सी. कार्ड इत्यादी कागदपत्रे, फिर्यादी यांना देवून सदर कार ही त्याने भाडे तत्वावर घेवुन त्याचे मालकीची नसताना देखील ती त्याचीच आहे असे भासवुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन केली व तसे कागदपत्रे सादर करुन इसम नामे आयुष कुलथे, अतिष नागतिलक, प्रथमेश शेटे, श्रीकांत बल्लोरे, सुजित बडगुजर, प्रविण सोनवळे व आकाश सोनवळे व इतर साथीदार यांनी मिळुन फिर्यादी यांचे ०३ लाख रुपये घेवून व बनावट कागदपत्रे आधारे कार विक्री करून फसवणुक केल्याने पोलिस स्टेशन स्वारगेट येथे.गु.र.नं.९२/२०२४ भा.दं.वि. कलम ४०६, ४१९, ४२०, ४६३,६४,६ ४६८, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता





सदर गुन्हयातील  आरोपींचा तपास पथकातील पोलिस अंमलदार अनिस शेख, शिवा गायकवाड व संदीप घुले यांनी शोध घेवुन दाखल गुन्हयातील आरोपी नामे १) आयुष अभय कुलथे वय २५ वर्षे, रा.बी.१००३ गोल्ड फिंगर तमारा सोसायटी रहाटणे पिंपरी पुणे २) सुजित भाईदास बडगुजर वय २६ वर्षे रा. सी २४०४ त्रिमया सोसायटी झील चौकाजवळ नन्हे गाव पुणे ३) प्रथमेश संतोष
शेटे वय २२ वर्षे धंदा शिक्षण सध्या रा. स्वप्न नगरी हौसींग सोसायटी गुरुद्वारा चौकाजवळ आकुर्डी पुणे यांना वेगवेगळ्या ठिकाणावरुन शिताफीने ताब्यात घेवुन अटक करुन तपासादरम्यान त्यांनी व पाहिजे आरोपी यांनी एकुण १५ ते १७ चारचाकी वाहनांची बनावट कागदपत्रे तयार करुन लोकांची फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर अटक आरोपींकडुन तपासादरम्यान बनावट कागदपत्रे व एकुण ०६ चारचाकी वाहने असा एकुण ३६ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त अमितेश कुमार,अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ-२पुणे शहर,स्मार्तना पाटील,सहा. पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग, नंदिनी वग्यानी यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट
पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप फुलपगारे, पोलिस निरीक्षक (गुन्हे)  गीता बागवडे यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलिस निरीक्षक प्रशांत संदे, पोलिस उपनिरीक्षक
अशोक येवले, पोशि अनिस शेख, शिवा गायकवाड, संदीप घुले, सुजय पवार,सोमनाथ कांबळे, दिपक खेंदाड,फिरोज शेख,रमेश चव्हाण,प्रविण गोडसे व मपोशि अनिता धायतडक यांनी एकत्र मिळुन केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!