चालक म्हनुन आला आणि महीलेस एक कोटीचा चुना लावुन गेला…
पुणे – मिळालेल्या माहितीनसार, पुण्यातील नाना पेठ येथे राहणाऱ्या एका महिलेचा डिसेंबर २०२१ मध्ये मृत्यू झाला. त्या महिलेकडे अजय राजाराम भडकवाड हा चालक म्हणून कार्यरत
होता. त्या महिलेचा ६२ वर्षीय पुतण्या जर्मनीत राहत होते. ते जर्मनी पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी भारतात आले. यावेळी त्यांनी घरातील कगदपत्रांची तपासणी केली असता, १ कोटी ६४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी फसवणुकीच्या
प्रकाराची खातरजा केली. या वेळी महिलेच्या नावावर अनेक शेअर असल्याची माहिती अजय भडकवाड याला माहिती असल्याचे कळले. महिलेच्या मृत्यूनंतर त्याने खोट्या सह्या करुन शेअर विकले. त्याचा पैसा महिलेच्या खात्यात जमा झाला. मग तिच्या बँकेच्या कागदपत्रावर खोट्या सह्या करून सर्व पैसे सहकारी बँकेत त्याच्या खात्यात वर्ग केले. हा सर्व प्रकार महिलेच्या पुतण्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीची तपासणी केल्यानंतर तब्बल १ कोटी ६४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अजय भडकवाड याला अटक केली.
दरम्यान, अजय भडकवाड महिलेकडे पार्ट टाईम ड्रायव्हर होता. तो एका फायनान्स कंपनीत अर्धवेळ काम करत होता. त्यामुळे त्याला शेअर्स आणि बँकिंगचे ज्ञान होते. त्याचा वापर करत त्याने फसवणूक केली, अशी माहिती समर्थ पोलिस ठाण्याचे पोलिस
निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी दिली.