पुणे सिंहगड पोलिस स्टेशन हद्दीत झालेल्या विजय ढुमे हत्येला अनैतिक संबंधाची धार,प्रेयसीनेच नवीन प्रियकरासोबत मिळुन रचला हत्येचा डाव…
पुणे – पोलिस लाईन बॅाय व निव्रुत्त पोलिस कर्मचाऱ्या चा मुलगा व एक व्यवसाईक विजय ढुमे याचा शुक्रवारी संध्याकाळी ६.४५ वा च्या सुमारास निर्घृण खून झाला. होता त्याचा तपास पोलिस करीत असतांना अनेक धक्कादायक खुलाशे आरोपीकडुन होताय घटनेच्या दिवशी विजय हा वडगाव बुद्रुक येथील क्वॉलिटी लॉजच्या खाली उतरतांना पार्किंगमधे जातांना सिसिटीव्ही मधे दिसला पार्किंगमधून बाहेर येत असताना दबा धरून बसलेल्या चार ते पाच जणांनी बांधकामाच्या लोखंडी सळई आणि लाकडी, लोखंडी दांडक्याने हल्ला करत त्याचा खून केला होता. या प्रकरणात
पोलिस अॅक्शन मोडवर आले होते. अखेर विजय ढुमे याच्या खुनाचा उलगडा करण्यात पुणे शहर पोलिसांना यश आले आहे. विजय ढुमे याचा खून अनैतिक संबंधातून झाला असून, सिंहगड रोड पोलिसांकडून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. महिलेच्या
प्रियकराकडूनच हा खून केल्याचे उघडकीला आले आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीतील २९ तासांच्या बंदोबस्तामुळे पोलिस कर्मचारी थकले होते. त्यानंतर सिंहगड रस्त्यावर खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव
घेतली. या घटनेनंतर पोलिस अॅक्शन मोडवर आले. आरोपींना पकडण्यासाठी लागलीच सूत्रे हाती घेतली. परिसरातील सीसीटीव्ही
फुटेजची तपासणी सुरु केली. या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू केले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार ते पाच आरोपी दिसत होते. अधिक तपास केला असता त्याची प्रेयसी व तिचा नवीन बॅायफ्रेंड यांनी मिळुन ही हत्या घडविल्याचे कबुल केले आहे
विजय ढुमे यांचे वडील पुणे शहर पोलिस दलात गुन्हेशाखा, सर्व्हेलन्स विभाग आणि निवृत्तीवेळी निगडी वाहतूक विभागात कार्यरत होते. त्यामुळे अनेक जणांबरोबर त्याची चांगली ओळख होती. अनेक पोलिस अधिकाऱ्यांशी त्याचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्याचे अनेक राजकीय व्यक्तींशी संबंध होते. हॉटेलच्या वादातून यांच्यावर यापूर्वी एक गुन्हा देखील दाखल झाला होता. हॉटेल आणि बांधकाम व्यवसायाच्या निमित्ताने त्यांची अनेक अधिकारी, राजकीय व्यक्तींशी व्यावसायिक भागीदारी होती. मागील ३० वर्षांपासून हे कुटुंब पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झाले होते.
शनिवारी रोजी काळेवाडी स्मशानभूमीत ढुमे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.