
बस स्थानकावर प्रवाश्यांचे दागिणे चोरणारा स्वारगेट पोलिसाचे ताब्यात…
प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी केली अटक…
पुणे (सायली भोंडे) – स्वारगेट एस टी स्टँड येथे प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यास स्वारगेट पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणी फिर्यादी सुरेश शिंदे रा.फ्लॅट नं.१०३ सी विंग सेलेस्टा स्पाईन रोड कुंदळवाडी फाटा चिखली पिंपरी चिंचवड हे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरी केली होती. अशी तक्रार दाखल करण्यात आली होती.


या बाबत सविस्तर माहिती अशी की, स्वारगेट पोलिस ठाणे पुणे शहर गु.र.नं. २४/२०२४ भा.द.वि. कलम.३७९ मधील फिर्यादी नामे सुरेश बाळासो शिंदे वय ५७ वर्ष धंदा- नोकरी रा. फ्लॅट नं.१०३ सी विंग सेलेस्टा स्पाईन रोड कुंदळवाडी फाटा चिखली पिपरी चिंचवड हे (दि.२१ जानेवारी) रोजी स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड येथे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरटयाने फिर्यादी यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरी केली होती. त्यावरुन फिर्यादी यांनी फिर्याद दिल्यावरुन गुन्हा दाखल करुन दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेणेबाबत आम्ही स्वतः तपासपथकातील अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शनपर सुचना देवुन आदेशीत केले होते.

त्यावरुन तात्काळ स्वारगेट पोलिस स्टेशन कडील तपासपथकाचे प्रभारी सहा. पोलिस निरीक्षक प्रशांत संदे तसेच तपास पथकातील अंमलदार पोशि कांबळे, शेख यांनी स्वारगेट एसटी स्टॅन्ड येथे जावुन तेथिल सीसीटीव्ही फुटेज चेक करुन त्याआधारे तसेच त्यांच्या गोपनिय बातमी वरुन अज्ञात आरोपीचा शोध घेतला असता, स्वारगेट एस.टी. स्टँड येथे एक संशयीत इसम दिसल्याने त्याचे दिशेने जाताच तो पळून जावु लागल्याने पोलिस स्टाफच्या मदतीने त्याचा पाठलाग करुन त्याला घेराव घालुन शिताफीने ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव व पत्ता संतोष रामकृष्ण शंकपाळ (वय ४९ वर्षे), रा.सर्मीक विहार जैननगरी पिसादेवी औरंगाबाद असे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यास पळुन जाण्याचे कारण विचारता तो उडवा-उडवीची उत्तरे देवु लागल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याचे उजव्या बाजुच्या पॅन्टचे खिशात एक अर्धवट तुटलेली सोन्याची चैन मिळुन आल्याने सदर चैन बाबत त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने उडवा-उडवीचे उत्तरे दिली. म्हणुन त्यास पोलिस ठाणे येथे आणुन त्यानंतर त्याचेकडे कसुन चौकशी केली असता त्याने सदरची चैन स्वारगेट एस.टी. स्टँड येथेच चोरी केल्याचे कबुल केले. नमुद गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्याचे चेनचे वर्णन व त्याचे खिशात मिळुन आलेल्या सोन्याचे चेनचे वर्णन मिळते जुळते असल्याने त्याच्याकडुन दाखल ३०,०००/- रुपये किंमतीची अंदाजे ०७ ग्रॅम वजनाची अर्धवट तुटलेली सोन्याची चैन असा मुद्देमाल तपासा दरम्यान जप्त करण्यात आला आहे.

अशा प्रकारे सदरची कामगिरी ही प्रविणकुमार पाटील अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, स्मार्तना पाटील पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर, श्रीमती नंदिनी वग्यानी सहा. पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेशसिंग गौड, श्रीमती संगीता पाटील पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलिस निरीक्षक प्रशांत संदे, पोलिस उप- निरीक्षक प्रतापसिंह शेळके, पो.हवा. विजय कुंभार, मुंढे, नापोशि. देवकाते, सोमनाथ कांबळे, सुजय पवार, शिवा गायकवाड, अनिस शेख, फिरोज शेख, रमेश चव्हाण, संदीप घुले, अनिस शेख, प्रविण गोडसे, दिपक खेदाड, संजय मस्के, यांनी एकत्र मिळुन केली आहे.


