
चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घुन हत्या…
विमाननगर(पुणे शहर) संदीप कद्रे
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक धक्कादायक
अशी घटना समोर आलेली असून चारित्र्याच्या संशयावरून एका
पत्नीवर चाकूने वार करून तिचा खून करण्यात आलेला आहे.
लोहगाव मधील संतनगर परिसरात ही घटना घडलेली असून नऊ
तारखेला हा प्रकार घडलेला आहे. प्राप्त माहितीनुसार रूपाली उर्फ बबीता आशिष भोसले (वय 35 राहणार संत नगर लोहगाव ) असे महिलेचे नाव असून याप्रकरणी तिचा पती आशिष सुनील भोसले (वय 32 राहणार संत नगर लोहगाव) याला अटक करण्यात आलेली आहे. भोसले दांपत्य लोहगाव भागातील संतनगर इथे भाड्याने खोली घेऊन राहत होते. आरोपी आशिष हा सफाई कामगार असून गेल्या काही महिन्यांपासून त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली होती. शनिवारी त्यांच्यात भांडण झाले त्यावेळी त्याने स्वयंपाक घरातील सुरी घेतली आणि त्यानंतर पत्नीवर वार केले. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर रूपाली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झालेला आहे.
विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे.




