अल्पवयीन मुलीशी विवाह; गर्भवती झाल्यानंतर सत्य उघड; पतीवर ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पुणे-(प्रतिनिधी )- मुलगी अल्पवयीन आहे, हे माहित असतानाही तिच्याशी विवाह केला. विवाहिता गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना कोंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी पतीवर कोंढवा पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कमला नेहरू हॉस्पिटलमधील डॉ. उन्मेश रमेश अंभोरे (वय-२९, रा. डॉक्टर्स रुम, कमला नेहरु हॉस्पिटल, मंगळवार पेठ, पुणे) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात रविवारी (ता. ५) फिर्याद दिली आहे. त्यानुसार आफताब आक्रबुद्दीन शेख (वय-२२, रा. शिवनेरी नगर, कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.





याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार जानेवारी २०२३ ते शनिवार (ता. ४ नोव्हेंबर) दरम्यान कोंढवा येथील शिवनेरीनगर येथे घडला. जानेवारी २०२३ मध्ये आरोपी आफताब याचा विवाह झाला. विवाहाच्या वेळी मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असून देखील त्याने तिच्यासोबत विवाह केला. विवाहानंतर आरोपीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यातून ती गर्भवती राहिली.



दरम्यान, कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये पीडित मुलगी तपासणीसाठी आली होती. त्यावेळी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिच्या वयाची चौकशी केली. त्यावेळी ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर डॉक्टरांनी कोंढवा पोलिस ठाण्यात आरोपी पतीविरुद्ध फिर्याद दाखल केली. याप्रकरणी पतीवर कोंढवा पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!