पत्नीला भेटायला गेलेल्या जावयाला सासुरवाडीत बेदम मारहाण
पत्नीला भेटायला गेलेल्या जावयाला सासुरवाडीत बेदम मारहाण
पुणे – धनकवडी भागात पत्नीला भेटण्यासाठी सासुरवाडीत जाणे एका जावयाला महागात पडले. सासरकडील मंडळींनी कौटुंबिक वादातून जावयाला चोप दिला. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश तुळसीराम उणेचा (वय ३४, रा.कुलभुषण सोसायटी, बिबवेवाडी-कोंढवा रस्ता) असे जखमी झालेल्या जावयाचे नाव आहे. उणेचा यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उणेचा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सासू हेमलता मूलचंद डांगी (वय ५०), सासरे मूलचंद पुखराज डांगी (वय ५५), मेहुणा प्रथमेश मूलचंद डांगी आणि पूजा मुलचंद डांगी (सर्व रा. मयुर कॉम्प्लेक्स, धनकवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उणेचा यांचा माहेरकडील मंडळीशी वाद झाला होता. वादामुळे त्यांची पत्नी धनकवडीत माहेरी आली होती. पत्नीला भेटण्यासाठी उणेचा आल्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाला. या मध्ये उणेचा यांना सासरकडील मंडळींनी बेदम मारहाण केली. मारहाणीत उणेचा यांच्या डोक्याला दुखापत झाली.