ललीत पाटील प्रकरणात अजुन एकास पुणे पोलिसांनी केली अटक…
पुणे – MD ड्रग प्रकारणातील मुख्य सुत्रधार ललित पाटील प्रकरणामध्ये आता आणखी एक अपडेट आली आहे सुत्राकडुन मिळालेल्या माहीतीनुसार या प्रकरणामध्ये अजुन एकास ज्याचे नाव रेहान शेख अन्सारी उर्फ गोलू याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ड्रग्जचा कारखाना उभारण्यासाठी रेहान शेखने ललित पाटीलला मदत केल्याची माहिती समोर आली आहे नाशिकमध्ये एमडी ड्रग्ज कारखान्याचा सेटअप उभारण्यासाठी रेहान अन्सारीने ललित पाटीलला मदत केली होती. तसंच रेहान अन्सारी हा ड्रग्जची मोठ्या प्रमाणात विक्री करत होता. ललित पाटील आणि भूषण पाटीलने नाशिकमध्ये उभारलेल्या कारखान्यासाठी रेहानने मोठी
मदत केली होती. ललित पाटीलने ड्रग्ज रॅकेटची मोठी जबाबदारी या रेहानकडे दिली होती. कुठे आणि कशी ड्रग्जची विक्री करायची, त्यातून किती पैसे मिळणार आहे आणि नाशिकच्या कारखान्यासाठी कोणत्या गोष्टी लागणार आहेत. याची सर्व जबाबदारी रेहान अन्सारी कडे होती. तो या सगळ्यावर लक्ष ठेवत होता.
त्याचप्रमाणे नाशिकमधील सराफ व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर असल्याचे कळते आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी
सराफा व्यावसायिकांची चौकशी होणार असल्याची माहीती आहे . कारण ड्रग्जच्या पैशातून ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील
याने नाशिकमधून सोनं खरेदी केल्याचं उघडकीस आल्यानंतर संबंधित सराफ व्यावसायिकाचे धाबे दणाणले आहेत. नाशिकचं ड्रग्ज प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन खुलाशे होतांना दिसताय राज्यातील पोलिसांची तीन पथके या प्रकरणात लक्ष घालत असल्याने वेगवेगळ्या ठिकाणाहून नवी माहिती समोर येत आहे.
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी नाशिकमध्ये मोर्चाही काढण्यात आला होता.
ललीत पाटीलला अटक केल्यानंतर या प्रकरणात त्याच्या दोन मैत्रिणींनाही अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा ड्रायव्हर सचिन वाघ याच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या आणि आता ललित पाटीलच्या आणखी एका साथीदाराला अटक करण्यात
पोलिसांनी यश आलं आहे.