ललीत पाटील याच्या दोन मैत्रिणी पुणे पोलिसाच्या ताब्यात,पुणे पोलिसांनी नाशिक येथुन केली अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

पुणे – सवीस्तर व्रुत्त असे की बहुचर्चित  ड्रग प्रकरणी फरार झालेल्या  ललित पाटील यास मुंबई पोलिसांनी काल चेन्नई येथुन अटक केली मग पुणे पोलिस सुध्दा ॲक्शन मोडमधे आल्याच दिसतय या प्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी एक कारवाई केली
आहे. दोन महिलांना नाशिक येथुन ताब्यात घेण्यात आलं आहे. दोन्ही आरोपी महिलांनी ललित पाटीलला पळून जाण्यासाठी
मदत केली होती अशी माहिती समोर येतेय.

आज पहाटे दोन्ही महिलांना नाशिकमधून अटक केलीय. प्रज्ञा
कांबळे, अर्चना निकम अस अटक केलेल्या दोन महिलांची नावे आहेत.





ड्रग्स प्रकरणातील मुख्य सूत्रधार ललीत पाटीलला आश्रय देणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे ललित पाटील फरार होण्यापूर्वी प्रज्ञा कांबळेकडे राहिला होता. तिला नाशिक पोलिसांनी काल पुणे पोलिसांकडे स्वाधीन केले होते. प्रज्ञा कांबळेकडे ललित
फरार होण्यापूर्वी एक दिवस राहिल्याची माहिती समजते.



प्रज्ञा कडून ललितने 25 लाख देखील घेतल्याची माहिती आहे. ललितने प्रज्ञाकडे मोठ्या प्रमाणावर चांदी ठेवली होती. ललित पाटील देशातून बाहेर फरार होण्याआधीच चेन्नई बॉर्डरवर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. प्रज्ञा कांबळेला ताब्यात घेण्यात आलं असून तिच्याकडे ललित पाटीलने मिळवलेली बेनामी संपत्ती असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.पुढील तपास पुणे पोलिस करतायत







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!