
सहाय्यक पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचे पथकाचा जुगार मटका अड्ड्यावर छापा…
सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील वेहेरगाव येथील मटका अड्ड्यावर छापा, रोख रकमेसह एकूण अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करून मटका अड्डा चालविणाऱ्या व मटका लावणाऱ्या 16 जणांविरोधात गुन्हा नोंद…
लोणावळा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की , लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील मौजे वेहेरगांव येथे काही इसम अवैधरित्या मटका अड्डा चालवत आहेत व त्यामुळे परिसरातील तरुण युवकांवर व नागरिकांवर वाईट परिणाम होत आहेत. त्यावरून सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी आज दिनांक 29/12/2023 रोजी त्यांचे पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले असता मौजे वेहेरगाव येथे मोकळ्या रानामध्ये एका झाडाखाली पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये मटक्याचे नंबर घेणारे दोन एजंट व मटका लावणारे 10 इसम हे ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे ताब्यातून रोख रक्कम व इतर असा एकूण 2,50,485रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरच्या इसमांकडे केलेल्या प्राथमिक तपासात इसम नामे 1) चंद्रकांत देवकर, 2) शंकर बोरकर, 3) निलेश बोरकर, 4) संतोष बोत्रे हे सदरचा मटका अड्डा चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे.


सदरबाबत पोलिसांनी दिलेल्या फिर्यदिवरून लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम चे विविध कलमान्वये वर नमूद 16 जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोउपनि शुभम चव्हाण, भारत भोसले, पोहवा नितेश (बंटी) कवडे, सचिन गायकवाड, अंकुश नायकुडे, नापोशि रईस मुलानी, पोशी सुभाष शिंदे, होमगार्ड सागर दळवी यांचे पथकाने केली आहे.



