अती ज्वलनशील वस्तुंची अवैधरित्या साठवणुक करणाऱ्यावर कामशेत पोलिसांचा छापा,मुद्देमाल हस्तगत…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अती ज्वलनशील अशा पेट्रोल/रॅाकेल सद्रुष्य पदार्थाची अवैधरीत्या साठवणुक करुन त्याची विक्री करणारे कामशेत पोलिसांनी केले गजाआड….

कामशेत(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की सहा पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी लोनावळा उपविभागात कुठल्याही  प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही त्याअनुषंगाने दि ३० जानेवारी रोजी ८:३० मौजे कामशेत ता.मावळ जि.पुणे गावचे हद्दीत सुभाष रतनचंद गदिया रामदिया कॉम्पलेक्स, कामशेत ता.मावळ जि.पुणे यांने गदिया कॉम्पलेक्स येथील एका खोलीत पेट्रोल सदृष्य व रॅाकेल सदृष्य ज्वलंतशिल द्रव्य पदार्थीचा अवैद्य साठा करून ठेवला आहे





अशी गोपनीय माहीती सहा. पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांना मिळाली यावरुन की सदर ठिकाणी छापा करण्याबाबत  आदेशीत केले सदर मिळालेल्या गोपनीय बातमीचे आधारे सदर ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी मानवी जिवीतास धोका होणेवा संभव असतानाही सुरक्षिततेबाबत योग्य ती दक्षता न घेता, हयमयीने व निष्काळजी पणाने अवैद्य साठा केलेला आढळुन आला ज्यात अत्यवशक वस्तु अधिनियमाचे उल्लंघन केलेने त्यावरून संबंधित इसम सुभाष स्तनचंद गदिया .मदिया कॉम्पलेक्स, कामशेत ता.मावळ जि.पुणे कामशेत पोलिस स्टेशनला गुरनं. २९/२०२५ भारतीय न्याय संहिता अधिनियम सन २०२३ वे कलम २८७ सह अत्यावश्यक वस्तु अधिनियम सन १९५५ चे कलम ३.७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला



सदर गुन्हयात घटनास्थळी खालीलप्रमाणे मुद्देमाल  मिळून आलेला आहे १) एक पिवळे रंगाचा अंदाजे २२० लिटर मापाचा प्लास्टिकचा बॅरल त्यामध्ये अंदाजे २०० लिटर मापाचे पेट्रोल सदृष्य द्रव्य पदार्थ किंमत अंदाजे २०,०००/- २)एक निळे रंगाचा अंदाजे २०० लिटर मापाचा प्लास्टिकचा बॅरल त्यामध्ये अंदाजे १८० लिटर मापाचे पेट्रोल सदृष्य द्रव्य पदार्थ किंमत अंदाजे १८०००/- ३)-एक निळे रंगाचा अंदाजे २०० लिटर मापाचा प्लास्टिकचा बॅरल त्यामध्ये अंदाजे १८० लिटर मापाचे पेट्रोल सदृष्य द्रव्य पदार्थ किंमत अंदाजे १८०००//- ४)एक लोखंडी अंदाजे २०० लिटर मापाचा सिल्वर रंगाचा बॅरल त्यामध्ये अंदाजे १८० लिटर मापाचे पेट्रोल सदृष्य द्रव्य पदार्थ किंमत अंदाजे १८०००/- ५) एक निळे रंगाचे ३५ लिटर मापाचे प्लास्टिकचे कॅन त्यामध्ये ३५ लिटर मापाचे रंगहीन रॉकेल सदृष्य द्रव्य पदार्थ एकुण किंमत २१००/- ६) एक निळे रंगाचे ३५ लिटर मापाचे प्लास्टिकचे कॅन त्यामध्ये ३५ लिटर मापाचे रंगहीन रॉकेल सदृष्य द्रव्य पदार्थ एकुण किंमत २१००/- ७) एक निळे रंगाचे ३५ लिटर मापाचे प्लास्टिकचे कॅन त्यामध्ये ३५ लिटर मापाचे रंगहीन रॉकेल सदृष्य द्रव्य पदार्थ एकुण किंमत २१००/- असा एकुन ८०,३००/-  वरील वर्णनाचा व किंमतीचा माल जप्त केलेला आहे.



सदरची कामगिरी  पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस   अधिक्षक रमेश चोपडे, सहा पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक, रविंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शेडगे, सफौ नितेंद्र कदम,पोहवा समिर करे, पोशि मारकड,माळवे,गारगोटे, ठाकुर, चापोशि रविद्र राउळ तसेच तहसिल कार्यालय, वडगांव मावळ येथील पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री तुषार तुकाराम तनपुरे व पुरवठा निरीक्षक संदिप प्रकाश तनपुरे यचि समक्ष केलेली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!