लोणावळा सहा.पोलिस अधिक्षक यांचे पथकाचा वडगाव मावळ येथे अवैध गुटखा विक्रेत्यांवर छापा….
सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची वडगाव मावळ मधील गुटखा विक्रेत्यावर धडक कारवाई, 2.5 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; तिघांविरोधात गुन्हा दाखल…..
लोणावळा(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख यांनी लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना उपविभागातील अवैध धंद्यांवर कडक कार्यवाही करणाच्या सुचना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने सहा.पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यापासुन अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच होती त्यानुसार सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की, वडगाव मावळ पोलिस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्रीकरिता साठवणूक करण्यात आली आहे. त्यावरून सहा.पोलिस अधीक्षक सत्यासाई कार्तीक यांनी दिनांक 18/03/2024 रोजी त्यांचे पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले असता पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये वडगाव मधील संस्कृती कॉलनी येथील चंद्रकांत ढोरे यांनी भाड्याने दिलेल्या पत्र्याचे शेड मध्ये इसम नामे 1) मोहम्मद आरिफ मोहम्मद युसुफ सिद्धीकी, वय 25 वर्ष, राहणार संस्कृती कॉलनी, वडगाव, ता.मावळ, जि पुणे, व अन्य एक विधिसंघर्षग्रस्त बालक त्यांचे ताब्यातुन महाराष्ट्र राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या प्रकारचा एकूण सुमारे 2,52,000 रू. (अक्षरी दोन लाख बावन्न हजार रूपये) एवढ्या किमतीचां गुटखा बाळगताना मिळून आले नमूद आरोपींकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत सदरचा माल हा इसम नामे 3)सलमान लियाकत हुसेन सिद्दिकी, वय अं 30 वर्ष, रा.संस्कृती कॉलनी, वडगाव, जिल्हा पुणे (सध्या फरार) याचे मालकीचा असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सदरचा मुद्दमाल जप्त करून वर नमूद तिन्ही आरोपींविरोधात वडगाव मावळ पोलिस स्टेशन येथे भादवि कलम 328 सह अन्न सुरक्षा अधिनियम 2006 चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वडगाव मावळ पोलिस करत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोउपनि शुभम चव्हाण, पो.हवा नितेश (बंटी) कवडे पोशि सुभाष शिंदे, गणेश येळवंडे यांचे पथकाने केली आहे.