अवैधरित्या रात्रभर चालणार्या हुक्का पार्लरवर सहा.पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचा छापा….
अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्या लोणावळ्यातील हॉटेल बैठक ढाबा ला ASP सत्यसाई कार्तिक यांचा जोरदार दणका,हॉटेल मालकासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल, हुक्क्यासाठी लागणारा 50 हजारांचा मुद्देमाल जप्त….
लोणवळा(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक,पुणे ग्रामीण पंकज देशमुख यांनी सर्व प्रभारींना अवैध धंदे संबंधात कडक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले होते त्या अनुषंगाने लोणावळा उपविभागाचे सहा.पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्विकारला तेव्हापासुन अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. तसेच सत्यसाई कार्तिक यांनी लोणावळा विभागातील सर्व प्रभारींना आपआपले हद्दीतील आस्थापना चालक यांना नेमून दिलेल्या नियमांचे व आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असे आव्हान केले होते. तरीही काही आस्थापना चालक त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत असून लोणावळा ग्रामीण पो.स्टे हद्दीतील हॉटेल बैठक ढाबा या हॉटेलमध्ये अवैधपणे हुक्का पार्लर चालत असल्याची खात्रीशीर माहिती सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती. त्याआधारे दिनांक 16/03/2024 रोजी मध्यरात्री सत्यसाई कार्तिक यांनी त्यांचे पथकासह हॉटेल बैठक ढाबा, जुना मुंबई पुणे महामार्ग, कार्ला, तालुका, मावळ, जिल्हा पुणे याठिकाणी छापा टाकला असता हॉटेलचालक हे सदरचे हॉटेलमधेच अवैध हुक्का पार्लर चालवून ग्राहकांना अवैधपणे हुक्का पिण्यासाठी देत असल्याचे मिळून आल्याने त्याठिकाणी विक्रीसाठी असलेला हुकक्यासाठी लागणारे पॉट, तंबाखुयुक्त फ्लेवर्स, फिल्टर, पाइप ई. असा एकूण 44,790 रु./- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिस स्टेशन लोणावळा ग्रामीण येथे इसम नामे 1) कृष्णा नाथा राठोड, वय 31 वर्षे, रा.लोणावळा कालेकरमळा, दत्त मंदीरासमोर लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे, 2) प्रताप कृष्णा डिंमळे वय 42 वर्षे, व्यवसाय हाटेल मालक, रा. कार्ला, ता. मावळ, जि.पुणे, 3) बिपीन्छु मार परमेश्वर महतो, वय 30 वर्षे, रा. भारती अपार्टमेंन्ट फ्लॅट नं.202 साईबाबा मंदीराजवळ शांतीनगर उल्हासनगर,ठाणे यांचेविरोधात सिगारेट व इतर तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वित्तरण, विनीमय) अधिनियम 2003 चे सुधारित अधिनियम 2018 चे कलम 4 (अ) व 21 (अ) सह भादवि कलम 188, 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोउपनि शुभम चव्हाण, रोहन पाटील, पो.हवा अंकुश नायकुडे, नापोशि. सचिन गायकवाड, पोशि सुभाष शिंदे, अंकुश पवार, गणेश येळवंडे, काळे,टकले, माळवे, पवार, मपोशि चवरे, शिंदे यांचे पथकाने केली आहे.