शस्त्राचा धाक दाखवुन खंडणी,दरोडा टाकणार्या टोळीच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पुणे – सवीस्तर व्रुत्त असे की शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पिंपरखेड, काठापूर, पंचतळे, जांबुत, कावळ पिंपरी परीसरातील
इसम

लियाकत नुरइस्लाम मंडल वय ५४ वर्ष, रा. निरगुडसर ता आंबेगाव जि पुणे





याचा बांधकाम व्यवसाय असून तो पिंपरखेड, जांबूत या परीसरात घरांची बांधकामे करतो. दि. ०२/०९/२०२३ रोजी काठापूर गावचे हद्दीत त्याचे काही इसमांनी अपहरण करून स्विफ्ट कारमध्ये जबरदस्तीने बसवून नेवून त्याचे जवळील मोबाईल, पाकीट, पाच हजार रुपये असे काढून घेतले व त्याला मारहाण करत फाकटे गावचे हद्दीत नेवून बांधकाम व्यवसाय करायचा असेल तर आमचे कडून वाळू घ्यायची आणि दहा लाख रुपये द्यावे लागतील असे म्हणून लियाकत मंडल याने पैसे देण्यास नकार दिल्याने अपहरण करणारे व्यक्तींनी त्यास  लाकडी काठी, दांडक्याने मारहाण करून त्याचा हात फ्रेंक्चर केला. त्यावेळी अपहरण करणारे एका व्यक्तीने त्याचे जवळील पिस्टल काढून कॉक केले आणि लियाकत मंडल याचे डोक्याला लावून तुला आता खल्लास करतो, असे म्हणत
पिस्टलचा ट्रिगर दावत असताना लियाकत मंडल याने एक लाख रुपये देतो असे सांगितलेने त्यास जिवंत सोडून त्याचे मुलाने
एक लाख रुपये आणून दिले नंतर लियाकत मंडल यास सोडून दिले. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे ७८५ / २०२३
भा.दं.वि.का.क. ३०७.३२६.३४९, ३६४ (अ).३८४.३८५.३८६, ३८७.३४ भा.ह.का.क. ३.२५ प्रमाणे नोंदविण्यात आला होता
सदरचा प्रकार हा ग्रामीण भागात घडल्याने  पोलिस अधीक्षक. पुणे ग्रामीण ,अपर पोलीस अधीक्षक  पुणे विभाग यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सूचना व मार्गदर्शन करून गुन्हयातील आरोपींचा शोध घेवून टोळी जेरबंद करणेबाबत आदेशित केले होते त्यानुसार
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी विशेष तपास पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्यास
सांगितले. गुन्हयातील अपहरण करणारे आरोपी हे सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने आरोपी गुन्हा केल्यानंतर पसार झाले होते आरोपीचा ठाव ठिकाणा लागू नये म्हणून आरोपी हे वेगवेगळया जिल्हयात जावून ठिकाणे बदलून राहत होते. त्यामुळे
आरोपींचे ठिकाणाजवळ पोलिस पथक पोहोचण्यापूर्वी आरोपी ते ठिकाण बदलून दुसऱ्या ठिकाणी जात होते. आरोपींची सखोल
माहिती काढून गुन्हयातील मुख्य तीन आरोपी हे कोरेगाव भिमा या परीसरात येणार असून ते मध्यप्रदेश राज्यात पळून जाण्याचे तयारीत असल्याची बातमी मिळाल्याने त्यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेले
आरोपींची नावे



१) अंकर महादेव पावळे, वय २६ वर्ष,



२) ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली श्रीकांत पावळे, वय २५ वर्षे, दोघे रा.
कावळ पिंपरी ता शिरूर जि पुणे

३) विशाल ऊर्फ आण्णा शिवाजी माकर, वय २३ वर्ष, रा. ढोकसांगवी ता शिरूर जि पुणे
अशी असून त्यांनी सर्वांनी आरोपी नामे

४) दिलीप रामा आटोळे वय ४५ वर्षे, रा. जांबूत दडेवस्ती ता. शिरूर जि पुणे,

५)निलेश बबन पळसकर, वय ३५ वर्ष रा. जांबुत ता. शिरूर जि पुणे यांनी सर्वांनी गुन्हा करण्याचा कट रचून गुन्हा करणेसाठी पाच गावठी पिस्टल व जिवंत काडतूसे उपलब्ध करून गुन्हा केला आहे. सर्व आरोपी ताब्यात घेवून चौकशी करता यातील आरोपी

नामे दिलीप आटोळे हा वाळू व्यावसायिक असून आरोपींचे ताव्यातून पाच गावठी पिस्टल, नऊ जिवंत काडतूस हस्तगत करणेत आलेले असून ३४००/- रूपये व फिर्यादीचे काढून घेतलेले आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, मोटारसायकल.ची चावी, लाकडी दांडके हस्तगत करणेत आलेले आहेत.
सदरची कामगिरी  पोलिस अधीक्षक . अंकित गोयल, पुणे ग्रामीण,  अपर पोलिस अधीक्षक .मितेश घट्टे पुणे विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलिस स्टेशनचे चे पोलिस निरीक्षक संजय जगताप, स्थागुशा चे पथकातील पोलिस उप-निरीक्षक गणेश जगदाळे, पोहवा तुषार पंदारे, राजू मोमीण, अतुल डेरे, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, विजय कांचन, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, ज्ञानेश्वर क्षिरसागर, हेमंत विरोळे, पोना धिरज जाधव, समाधान नाईकनवरे, बाळासाहेब खडके, शिरूर पो.स्टे. चे पोलिस उप-निरीक्षक  अभिजीत पवार, सफौ जी. एन. देशमाने, पोहवा नितीन सुद्रीक, पोना बाळू भवर, पोना एन. जगताप, पोना व्ही मोरे, पोको एन. थोरात, पोकॉ. ए. भालसिंग, पोकॉ. आर. हाळनोर, मपोकों, पी. देशमुख यांनी केली असून पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशन करत असून आरोपीना दि. २१/१०/२०२३ रोजी पर्यंत पोलिस कोठडी मंजूर करण्यात आलेली आहे.
अंकुर महादेव पावळे

दाखल गुन्हे
९) शिरूर पो स्टे गुरनं ४५९/२०१५ भादंवि ३६३.३७६
२) शिरूर पो स्टे गुरनं ८१६/२०२९ भादंवि ३९५, १२०(८), २०१,
भा.ह.का.क. ३,२५
३) नारायणगाव पो स्टे गुरनं ३९ / २०२२ भादंवि ३०२,१२० (ब).
१४३, १४७, १४८, १४९
विशाल ऊर्फ आण्णा शिवाजी १) रांजणगाव पो स्टे गुरनं १७६/२०१७ भादंवि ३५४ अ, ४५२,
माकर १४३.१४७,१४८,१४९,५०४,५०६
२) नारायणगाव पो स्टे गुरनं ३९/२०२२ भादंवि ३०२,१२०(ब),
१४३, १४७, १४८.१४९
ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली श्रीकांत १) नारायणगाव पो स्टे गुरनं ३९/२०२२ भादंवि ३०२,१२० (ब).
पावळे दिलीप रामा आटोळे
१४३.१४७, १४८.१४९
१) शिरूर पो स्टे गुरनं १०५/२०११ भादंवि ३०२ इतर
२) पारनेर पो स्टे गुरनं ८६/२०१३ भादंवि ३०७
३) शिरूर पो स्टे गुरनं ६२/२०२२ भादंवि ३२६,३०७
४) शिरूर पो स्टे गुरनं ८५/२०२२ भादंवि ३८७,३२३
५) नारायणगाव पो स्टे गुरनं ३९ / २०२२ भादंवि ३०२,१२०
(ब),१४३, १४७,१४८, १४९





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!