खेड,शिवापूर,हवेली परीसरात दरोडा टाकणार्या सराईत गुन्हेगारास ६ लक्ष रु व दिडशे ग्राम सोन्यासह केली स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

पुणे ग्रामीण पोलिस -(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की
सप्टेंबर महिन्यात राजगड व हवेली पोलिस स्टेशन हद्दीत अपार्टमेंट मधील बंद सदनिकांमध्ये दिवसा घरफोडी चोरीचे प्रमाणे वाढले होते. याबाबत  पोलिस अधीक्षक,पुणे ग्रामीण यांनी गुन्हयांची उकल
करून आरोपी जेरबंद करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांना दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सर्व घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाची पाहणी करता, सर्व घरफोडी चोरीचे गुन्हयांमध्ये बंद सदनिकांत दिवसा चोरी झालेली होती. त्यानुसार  उपलब्ध सर्व गुन्हयांचे सीसीटीव्ही तपासण्यात आले.त्याचप्रमाणे दिवसा घरफोडी करणारे रेकॉर्डवरील आरोपींची सद्यस्थितीची माहिती घेतली असता,  सप्टेंबर २०२३ चे
पहिल्या आठवडयात जामीनावर बाहेर आलेला सराईत गुन्हेगार यानेच घरफोडया केल्याचे तपासात पुढे आले, त्याचआधारे
बातमीदारांकडून प्राप्त झालेल्या माहितीचे आधारे संशयित सराईत गुन्हेगारावर स्था. गु. शा. चे पथकाने नजर ठेवणेस सुरूवात केली. दि १५/१०/२०२३ रोजी संशयित सराईत गुन्हेगार हा खडकवासला परीसरातील धरण चौकाजवळ बसलेला आहे, अशी बातमी मिळाल्याने त्यास सापळा लावून ताब्यात घेतले असता, त्याने त्याचे नाव

अतुल ऊर्फ अठ्या चंद्रकांत आमले वय २८ वर्षे, रा. आकाशनगर, अशोक गोडांबे, वारजे, यांचे खोलीत, पुणे





असे असल्याचे सांगून त्यानेच खेड शिवापूर, नांदेडगाव, डोणजे परीसरात दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
अतुल आमले याचेवर वेगवेगळया जिल्ह्यात घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असून तो दि ०३/०९/२०२३ रोजी जामीनावर सुटलेला आहे. सराईत गुन्हेगार असल्याने त्याने जामीनावर सुटल्यानंतर लागलीच दि. ०७/ ९/२०२३ रोजी खेड शिवापूर परीसरातील बंद सदनिकामध्ये चोरी केली व त्यानंतर नांदेडगाव, डोणजे, हिंजवडी परीसरात घरफोडी चोरीचे गुन्हे केले आहेत. आरोपी अतुल चंद्रकांत आमले याचेकडून खालीलप्रमाणे ०९ गुन्हे उघडकीस आले असून
त्याचेकडून गुन्हयांतील चोरी गेलेले ६,६४,५००/- किं. चे सुमारे १५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच गुन्हयात वापरलेली अॅक्टीव्हा मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेली आहे. आरोपी अतुल आमले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर कोथरूड, वारजे, दत्तवाडी, अलिबाग, रावेत पो स्टे ला यापुर्वीचे सुमारे २३ गुन्हे दाखल आहेत
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अंकीत गोयल,पुणेग्रामीण,अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे ,पुणे विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस स्चेशन,राजगड चे पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, पोलिस स्टेशन हवेलीचे  पोलिस निरीक्षक सचिन वांगडे, स्थागुशा चे पथकातील सहा.पो.निरीक्षक नेताजी गंधारे,पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, पोलिस अंमलदार सचिन घाडगे, राजू मोमीण, अतुल डेरे, चंद्रकात जाधव, मंगेश थिगळे, अमोल शेडगे, तुषार भोईटे, धिरज जाधव, मंगेश भगत, प्राण येवले, हेमंत विरोळे, दत्ता तांबे, समाधान नाईकनवरे, बाळासाहेब खडके, अक्षय सुपे, राजगड सपोनि नितीन खामगळ, पोना सोमनाथ जाधव, हवेली पोस्टे चे सपोनि सागर पवार यांनी केली असून पुढील तपास हवेली पोलीस स्टेशन करत आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!