बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन दागिने मौल्यवान वस्तु चोरणारी महीला स्ऱ्थागुशा पथकाच्या ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

एस.टी. स्टँडवर बस मध्ये बसण्याचे बहाण्याने गर्दीचा फायदा घेत प्रवाश्यांचे बॅगेतील सोन्याचे दागिने व रक्कम चोरी करणारी सराईत महिला आरोपी जेरबंद करून २३५ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ११,६४,०००/- किंचा मुद्देमाल केला हस्तगत – स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलिस स्टेशन पुणे ग्रामीणची कारवाई…..
पुणे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.०२/०३/२०२४ रोजी फिर्यादी नामे अलका वसंतराव बनकर, वय ५९ वर्षे, रा. ताम्हाणेनगर, अकलूज ता. माळशिरस, जि. सोलापूर या पुणे येथे जाणेकरीता इंदापूर एस.टी. स्टँड येथून एस. टी. बस मध्ये बसून पुण्याकडे निघाल्या होत्या. एस.टी. बस मध्ये चढताना त्यांचे बॅगेतील लहान पर्स कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा
घेवून चोरून नेली होती. त्यामध्ये साडे पंधरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ८,०४,०००/- रु. किं.चा मुद्देमाल चोरी गेला आहे. त्याबाबत इंदापूर पोलिस स्टेशन गु.र.नं. २१८/२०२४ भादवि कलम  ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात  आलेला होता

सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकामार्फत चालू असताना सीसीटीव्ही तपासण्यात आले. गुन्हयाचे कार्यपद्धतीचा अभ्यास केला. गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील महिला आरोपी नामे अश्विनी अवि भोसले रा. माही जळगाव ता. कर्जत जि. अहमदनगर हिने सदरचा गुन्हा केलेबाबत बातमी मिळाली होती. सदर महिला आरोपीची माहिती मिळवून तपास चालू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहीती मिळाली की, सदरची महिला आरोपी ही कर्जत परीसरात आली आहे  दि. ०७/०३/२०२४ रोजी स्था.गु.शा. चे पथक व इंदापूर पोलिस स्टेशन कडील तपास पथकासह कर्जत परीसरात जावून सापळा रचून आरोपी महिला नामे अश्विनी अवि भोसले, वय २३ वर्षे, रा. माही जळगाव ता. कर्जत जि. अहमदनगर हिस ताब्यात घेण्यात आले. तिचेकडे करणेत आलेल्या चौकशीत तिने नमुद गुन्हा केल्याचे सांगितले असून तिला विश्वासात घेवून तिचे कडे चौकशी करता, तिने १) खेड पोलिस स्टेशन गुन्हा रजि.नं. १४९१/२०२४ भा.दं.वि.का.क. ३७९ व २) इंदापूर पो स्टे गु.र.नं. ६१० / २०२३ भा.दं.वि.का.क. ३७९ यांचेसह एकूण तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. महिला आरोपी नामे अश्विनी अवि भोसले हिचेकडून नमुद गुन्हयांतील चोरी गेलेल्या सोन्याचे दागिन्यांपैकी २३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ११,६४,०००/- किं.चा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे. महिला आरोपी अश्विनी अवि भोसले, वय २३ वर्षे, रा. माही जळगाव ता. कर्जत जि. अहमदनगर हिचे विरोधात यापुर्वी जामखेड, करमाळा, हडपसर, पिंपरी पोलिस स्टेशनला अशा प्रकारचे एकूण ५ गुन्हे दाखल आहेत.





सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक  पंकज देशमुख, पुणे ग्रामीण,  अपर पोलिस अधीक्षक संजय जाधव, बारामती विभाग,उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, बारामती यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, इंदापूर पो स्टेचे पोनि सुर्यकांत कोकणे, स्था. गु. शा. चे सपोनि योगेश लंगुटे, कुलदीप संकपाळ, इंदापूर पो स्टे चे पोउपनि विवेकानंद राळेभात, स्थागुशाचे पोलिस अंमलदार बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, राजू मोमीण,
अतुल डेरे, निलेश शिंदे इंदापूर पोस्टे चे पोलीस अंमलदार प्रकाश माने, सलमान खान, नंदू जाधव, विशाल चौधरी, गणेश डेरे, निलेश केमदारने, महिला पोलिस अंमलदार रेश्मा जगताप, वंदना भोंग यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!