अट्टल गुन्हेगार पवन उर्फ मारोती पोळेकर यास पुणे ग्रामीण पोलिसांनी १ वर्षाकरीता केले स्थानबध्द….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

यवत(पुणे ग्रामीण) – पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीण अंकीत गोयल यांनी  अवैध्य शस्त्र बाळगणे, अंमली पदार्थ विकी करणारे, अवैध्य बाळु व्यवसाय करणारे, अवैध्य दारू विक्री करणारे, तसेच सार्वजनिक शांततेस बाधा आणणारे धोकादायक व्यक्ती मोडीत याचे विरुद्ध विशेष मोहिम राबवित आहेत. त्यानुसार पुणे ग्रामीण जिल्हयाचे हददीतील गुन्हेगारी मोडीत  काढण्यासाठी तसेच दरोडा, जबरी चोरी, हायवे रोडवरील लुटमारी करणारे, व्यावसायीकांकडे खंडणीची मागणी करून खंडणी स्विकारणारे, खुनाचा प्रयत्न करणारे, धोकादायक व्यक्ती याची समाजातील गुंडगिरी खोडुन काढण्यासाठी व अशे कृत्ये करणारे गुन्हेगार  यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी समाजातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा आणणारे धोकादायक व्यक्ती यांचे विरुद्ध कारवाईचा बडगा उगारून एम पी डी ए कायदयांतर्गत स्थानबध्द करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलिसांना दिले होते. त्यावरून यवत पोलिस स्टेशन हददीमधील पाटस ता दौड, जि. पुणे येथे वास्तव्यास असलेल्या धोकादायक इसम नामे

पवन ऊर्फ मारूती विष्णु पोळेकर, वय २४ वर्षे, रा. अविकानगर, पाटस, ता दौड जि.पुणे





याने  संगणमत करून जबरी चोरी करणे, जबरी चोरी करताना जबर मारहाण करणे, अवैधरित्या गौण खनिजाची वाहतुक
करणे, स्त्रीयांचा विनयभंग करणे, घातक हत्यारांचा वापर करून पोरांची टोळी तयार करणे, यासारखे १२ गुन्हे दाखल होते. तो सराईत धोकादायक असल्याने त्याचेवर एम पी डी ए कायदयांतर्गत कार्यवाही होणेकामी श्री हेमंत शडगे पोलिस निरीक्षक यवत पोलिस स्टेशन
यांनी अंकीत गोयल, पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांना प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन पोलिस अधीक्षक ,पुणे ग्रामीण यांनी करून तो प्रस्ताव पुढील कार्यवाही करीता  जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे यांचेकडे पाठविला होता. मा जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे राजेश देशमुख यांनी इसम पवन ऊर्फ मारूती विष्णु पोळेकर, वय २४ वर्षे, रा. अविकानगर, पाटस, ता दौड जि. पुणे याला सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा ठरेल अशा प्रकारची कृत्ये करण्यापासून प्रतिबंध या दृष्टीने त्यास महाराष्ट्र झोपडपटटीदादा, हातभटटीवाले औषधीद्रव्य विषयक
गुन्हेगार धोकादायक व्यक्ती, दुकश्राव्य कलाकृतीची विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती (व्हिडीओ पायरेटस) वाळूतस्कर व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणा-या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंधक करण्याविषयीचा कायदा सन १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये १ वर्षाकरीता त्याचे कार्यालयाकडील आदेश पगम / एम पी डि ए/एस आर/ ०४/०१/२०२३ दिनांक ३१/१०/२०२३ अन्वये स्थानबध्द करण्याचा आदेश
पारीत केला आहे. तथा जिल्हादंडाधिकारी पुणे राजेश देशमुख यांचे
आदेशान्वये इसम नामे पवन ऊर्फ मारूती विष्णु पोळेकर, वय २४ वर्षे, रा. अविकानगर, पाटस ता दौड जि.पुणे यास यवत पोलिस स्टेशनकडील पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी यवत पोलिस स्टेशनला नेमणुकीस असलेले पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून शोध घेवून त्यास दिनांक ०९/११/२०२३ रोजी ताब्यात घेवून त्यास येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे दाखल करुन एक वर्षाकरीता स्थानबध्दतेची कारवाई केलेली आहे.
सदरची कामगिरी हि  अंकित गोयल, पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण
आनंद भोईटे अपर पोलिस अधीक्षक, बारामती विभाग पुणे ग्रामीण,  स्वप्नील जाधव उपविभागीय पोलिस अधिकारी उपविभाग दौड याचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक . हेमत शेडगे, यवत पोलिस स्टेशन, पोलिस उपनिरीक्षक श्री संजय नागरगोजे, पोलिस उपनिरीक्षक, आकाश शेळके व पोलिस स्टेशन पोहवा महेश बनकर, राजु मोमीन, अतुल डेरे स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व पोवाहक निलेश कदम, गुरु अक्षय यादव, जगताप, पो हवा महेंद्र चांदणे नुतन जाधव पो ना खोपरे, पो कॉ सुजीत गायकवाड, पो हवा राम मोना सोनल शिंदे जगताप यवत पोलिस स्टेशन यांनी केलेली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!