
सहा पोलिस अधिक्षक लोणावळा यांचा वेहेरगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा…
सहा.पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचा वेहेरगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा,१० जुगारींना घेतले ताब्यात…,
लोणावळा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पुणे ग्रामीण पोलिस दलाचे वतीने सुरू असलेल्या “संकल्प नशामुक्ती अभियान” अंतर्गत लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांना दिनांक ३१ रोजी सायंकाळी गुप्त बातमीदाराच्या मार्फत बातमी मिळाली की लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील वेहेरगाव येथील संतोष बोत्रे यांच्या पडीक जमिनीमध्ये झाडाचे खाली काही इसम कल्याण मटका नावाचा जुगार खेळत आहे


अशा खात्रीशीर माहितीच्या अनुषंगाने मिळाल्याने लागलीच पोलिस पथक व पंचायमव्त छापा टाकला असता सदर ठिकाणी इसम
1) गोरख रघूनाथ मोहीते, वय 65 वर्षे, रा. टाकवे खुर्द, ता. मावळ, जि.पुणे, 2) सुनिल आप्पा बंडगर, वय 30 वर्षों, रा.न-हेगाव ता हवेली जि पुणे मुळ रा काश्टी ता लोहारा जि उस्मानाबाद, 3) धोंडू दत्तू बोरकर, वय 52 वर्शे, रा. वेहेरगाव, ता. मावळ, जि. पुणे, 4) विश्वनाथ संभाजी गायकवाड वय 44 वर्षे, रा. टाकवे खुर्द, ता. मावळ, जि.पुणे, 5) गजानन किसन पारधी, वय 52 वर्षे, रा.भाजे, ता.मावळ, जि. पुणे,
6) सचीन गणेश तिकोणे, वय 41 वर्षे, रा.पाटण, ता.मावळ, जि.पुणे,
7) मधूकर केशव बगाडे, वय 72 वर्षे, रा.मळवली, कामषेत, ता. मावळ, जि.पुणे, 8) विलास भागुजी देशमुख, वय 42 वर्षे, रा. वेहेरगाव, ता.मावळ, जि.पुणे, 9) संदीप षांताराम कौदरे वय 36 वर्षे, रा. वाकसई, ता. मावळ, जि.पुणे 10) चंद्रकांत देवकर, रा. वेहरगांव, ता. मावळ, जि. पूणे असे कल्याण मटका नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना रोख रक्कम, साहित्य, मोटार सायकल, पावती पुस्तके, मोबाईल फोन असा एकूण १,६४,७००/- रु मुद्देमालासह मिळून आल्याने त्यांच्याविरोधात लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन ला मुंबई जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला केला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागिय पोलिस अधिकारी लोणावळा तथा सहा.पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी त्यांचे पथकातील पोहवा नितेश (बंटी) कवडे, अंकुश नायकुडे, दत्ता शिंदे, अंकुश पवार यांनी केली आहे.



