सहाय्यक पोलिस अधिक्षकांचा अवैध गुटखा व्यापाऱ्यांना दणका…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

सहा.पोलिस अधीक्षक  सत्यसाई कार्तीक यांची लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण पो.स्टे हद्दीत अवैधरित्या गुटख्याची साठवणूक करणाऱ्या दोन जणांवर धडक कारवाई. कारवाईमध्ये सुमारे एक लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त….

लोणावळा(पुणे)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, लोणावळा उपविभागाचे सहा.पोलिस अधीक्षक/उपविभागिय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. सत्यसाई कार्तीक यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत अशी माहीती मिळाली होती की, लोणावळा ग्रामीण व शहर पोलिस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्रीकरिता साठवणूक करण्यात आली आहे. त्यावरून सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी दि.(22) रोजी त्यांचे पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले असता पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये लोणावळा ग्रामीण पो.स्टे. हद्दीत मौजे औंढे तालुका मावळ जिल्हा पुणे येथे इसम नामे





1)मच्छिंद्र किसन घनवट, वय 32 वर्ष हा त्याचे मालकीचे खोलीमध्ये, व लोणावळा शहर पो.स्टे. हद्दीत इसम नामे



2)धवल रमेश लुनावत हा त्याचे मालकीचे लूनावत होलसेल स्टोअर्स, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लोणावळा, तालुका मावळ, जि पुणे अशा दोन इसमांचे ताब्यातून महाराष्ट्र राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या प्रकारचा एकूण सुमारे 01,02,209/- रू. एवढ्या किमतीचां गुटखा जप्त करून नमूद दोन्ही इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदरबाबत अनुक्रमे लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन व लोणावळा शहर पोलिस स्टेशन येथे भादवि कलम 328 सह अन्न सुरक्षा अधिनियम 2006 चे विविध कलमान्वये दोन स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण व लोणावळा शहर पोलीस करत आहेत.



सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोउपनि शुभम चव्हाण,भारत भोसले, पो.हवा अंकुश नायकुडे, बंटी कवडे, मपोहवा आशा कवठेकर,पोशि सुभाष शिंदे,गणेश येळवंडे यांचे पथकाने केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!