नियमांची पायमल्ली करणाऱ्या दोन ॲार्केस्ट्रा बारवर सहा.पोलिस अधिक्षकांचा छापा….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

नियमांची पायमल्ली करणाऱ्या मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बारवर सहा.पोलिस अधिक्षक यांची सत्यसाई कार्तिक यांची दणकेबाज कारवाई……

लोणावळा(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कार्यवाहीचे सत्र सुरु असतांना जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट ई.यांचेकरिता प्रशासनाने वेळेचे बंधन घालुन दिलेले असतानाही काही आस्थापना चालक त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत असल्याबाबतची माहिती सत्यसाई कार्तिक यांना प्राप्त झाली होती.





त्याची खातरजमा करण्याकामी  सत्यसाई कार्तिक हे दिनांक १०/०८/२०२४ रोजी मध्यरात्री त्यांचे पथकासह नमूद माहिती मिळालेल्या ठिकाणी गेले असता कामशेत येथील १)दीपा बार अँड रेस्टॉरंट, व वडगाव मावळ मधील २) फ्लेवर्स बार अँड रेस्टॉरंट अशा दोन्ही ठिकाणी पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये वरील बार रेस्टॉरंट चालक हे विहित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी त्यांचे ग्राहकांना खाद्यपदार्थ, दारू ई.ची विक्री करताना मिळुन आल्याने नमूद दोन्ही बारमालकांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम ३३ (डब्ल्यू), १३१ अन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.



पुढील तपास अनुक्रमें कामशेत व वडगाव मावळ पोलीस करत आहेत. तसेच अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना चालकांवर कठोर कायदेशीर कारवाईची मालिका यापुढेदेखील सुरच राहणार असून आस्थापना चालकांनी त्यांना घालून दिलेल्या नियमांचे व वेळेच्या बंधनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन सहा पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी केले आहे.



सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,लोणावळा सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि शेंडगे, पोहवा अंकुश नायकुडे, पोहवा गायकवाड, पोहवा होले,पोशि पवार डोईपोडे, यांनी त्यांचे पथकासह केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!