लोणावळा सहा.पोलिस अधिक्षकांचे पथकाने MD Drug सह पाच आरोपींना घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांचे संकल्पनेतुन नशामुक्ती अभियानांतर्गत कारवायांचा धडाका सुरूच; दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सव्वा लाखांच्या एम.डी पावडरसह  18 लाखांचा मुद्देमाल जप्त,पाच आरोपींना घेतले ताब्यात…

लोणावळा(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, काही दिवसांपासून लोणावळा विभागात अंमली पदार्थांची चोरून विक्री होत असुन त्यामुळे परिसरातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याची माहिती सहा पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती. त्यासाठी त्यांनी संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेऊन त्याअंतर्गत परिसरातील युवकांमध्ये जनजागृती करणे, तसेच अंमली पदार्थांचे सेवन, साठवणुक व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. संकल्प नशामुक्ती अभियानाचाच एक भाग म्हणून सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अंमलीपदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात गेल्या काही दिवसात कठोर कायदेशीर कार्यवाही करून अनेक आरोपींना जेरबंद करून त्यांचेकडून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ हस्तगत केले आहेत.





त्याअनुषंगाने दिनांक 29/07/2024 रोजी  सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, मौजे पाथरगाव  हद्दीत काही इसम हे चारचाकी वाहनातून एम.डी हा अंमली पदार्थ विक्रीकरिता घेऊन येणार आहेत. त्यानुसार सत्यसाई कार्तिक यांचे पथकाने परिसरात सापळा रचला होता.मिळालेल्या बातमीप्रमाणे दि.29/07/2024 रोजी रात्री 11.40 वाजताच्या सुमारास मौजे पाथरगाव जवळ, जुने मुंबई पुणे हायवे रोडवरील हॉटेल मावळ माची समोर एक संशयित वाहन थांबल्याने सत्यसाई कार्तिक व पथकाने सदर वाहन थांबवून गाडीतील इसमांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने व त्यांच्यावर संशय बळावल्याने पोलिस पथकाने जागेवरच  नमूद इसमांचे घेतलेल्या झडतीमध्ये नमूद इसमांचे ताब्यात एकूण 5.05 ग्रॅम एम.डी पावडर मिळून आल्याने सीलबंद करून ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच नमूद इसमांकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा माल हा विक्रीकरीता घेऊन जात असल्याचे सांगितले आहे. सदरच्या कारवाई मध्ये 1)योगेश केशव गायकवाड, रा.कांब्रे, तालुका मावळ, जिल्हा पुणे , 2)नारायण सोपान दाभाडे, रा. व्हिजन सिटी, जांभूळ, तालुका मावळ जिल्हा पुणे यांना त्यांचे चारचाकी वाहनासह ताब्यात घेऊन कामशेत पो.स्टे येथे आणून सदरबाबत पो. शि अमोल ननवरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून कामशेत पो.स्टे. गु र.न. 157/2024 एन.डी.पी.एस ॲक्ट 1985 चे कलम 8(क), 21(ब) (क), तथा भारतीय न्याय संहिता कलम 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास कामशेत पो.स्टे चे पोलिस निरीक्षक रविंद्र पाटील हे करत आहेत.



तसेच  दिनांक 30/07/2024 रोजी सत्यसाई कार्तिक यांचे पथकाने त्यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार लोणावळा शहर पो.स्टे हद्दीतील मौजे नांगरगाव चे हद्दीत टाकलेल्या छाप्यात  1)शाहरुख असलम शेख, राहणार केवरे वसाहत लोणावळा, तालुका मावळ जिल्हा पुणे, 2)नितीन भरत कालेकर, राहणार केवरे वसाहत, तालुका मावळ, जिल्हा पुणे, 3) साजीद अकबर शेख, राहणार टेबल चाळ, लोणावळा, तालुका मावळ जिल्हा पुणे हे त्यांचे ताब्यातील केटीएम ड्यूक दुचाकीवरून एम.डी पावडर विक्रीकरिता घेऊन जात असताना मिळून आल्याने  त्यांचे ताब्यातून एकूण 7.1 ग्रॅम एम.डी पावडरसह सुमारे 1.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरबाबत पो. शि सुभाष शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोणावळा शहर पोलिस स्टेशन येथे गु.र.न.323/2024 एन.डी.पी एस ॲक्ट 1985 चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा शहर पो.स्टे चे पोलिस उपनिरीक्षक रोहन पाटील करत आहेत.



वर नमुद दो्न्ही कारवायांमध्ये रु.1,22,210/- रु.किमतीच्या एकूण 12.15 ग्रॅम एम.डी पावडर सह एकूण रु.18,25,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पोलिस सखोल तपास करत आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीन पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सहा पोलिस निरीक्षक सचिन राऊळ, पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पो.हवा नितेश (बंटी) कवडे, पो.हवा अंकुश नायकुडे नापोशि दत्ता शिंदे, पोशि गणेश येळवंडे, सुभाष शिंदे, अंकुश पवार, अमोल ननवरे,महेश थोरात,गणेश ठाकुर ,प्रतीक काळे यांचे पथकाने केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!