दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या शिक्रापुर पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

शिक्रापुर(पुणे ग्रामीण) :  ( महेश बुलाख)

सवीस्तर व्रुत्त असे की शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीत  सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे येथे राहणारे हिमांशु ब्रिजेशकुमार पटेल, शिवापन्ना लाला पटेल व त्यांचा मित्र कृष्णाकांत आदिवासी हे तिघेजण दिनांक ०६/१०/२०२३ रोजी पहाटे ०३.३० वाजणेचे सुमारास कामावरून सुटल्यानंतर बसमधुन सणसवाडी येथे उतरले होते. सणसवाडी येथील एल अॅण्ड टी फाटा येथुन घरी तिघेही रोडने पायी चालत जात असताना तेथे अचानक दोन मोटार सायकलवर अनोळखी ५ चोरटे आले. त्या पाचही चोरटयांनी रात्रीच्या अंधारात हिमांशु ब्रिजेशकुमार पटेल, शिवापन्ना लाला पटेल व कृष्णाकांत आदिवासी यांना धारदार कोयत्याने मारून टाकण्याची धमकी देवुन त्यांचे खिशातील मोबाईल, रोख रक्कम असा १४,९७० /- रू. किंमतीचा ऐवज दरोडा  टाकुन चोरून पुढे हायवे रोडने त्यांचे दोन्ही मोटारसायकलवर पाचही चोरटे पळुन गेले. झालेल्या गुन्हयाबाबत हिमांशु ब्रिजेशकुमार पटेल यांनी शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे तकार दिल्याने दरोडयाच्या गुन्हयाची नोंद झाली होती. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन शिकापुर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक  प्रमोद क्षिरसागर यांनी तात्काळ वरीष्ठांना गुन्हयाची माहीती देवुन सदर गुन्हयातील आरोपींच्या शोधासाठी दोन स्वतंत्र पथक तयार करून ते रवाना केले होते. त्याप्रमाणे शिकापुर पोलिस स्टेशनचे तपास पथकातील अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी यातील आरोपींचा गुप्त बातमीदार व सी.सी.टी. व्हि. फुटेज मागोवा घेवुन गुन्हयातील संशईत पाचही आरोपी





१ ) श्रीकांत मिनीनाथ मारणे, वय २८ वर्षे, रा. कोथरूड, पौडफाटा, हनुमाननगर, शंकरमंदीरा समोर, पुणे,



२) रोहीत बाबुराव पवार, वय १८ वर्षे, रा. धायरीफाटा, लाडलीसाडी सेंटर जवळ, पुणे,



३)गणेश नितीन जावडेकर, वय १८ वर्षे, रा. रायकरमळा, धावरीनॅनो कॉम्पलेक्स, तिसरा मजला, पुणे, मुळ रा. दत्तवाडी, जनता वसाहत, पर्वती पायथ्या जवळ, पुणे,

४) जितेंद्र शंकर चिंधे, वय ३१ वर्षे, रा. दत्तनगर, जांभळवाडी, काकापवार तालीम शेजारी, कात्रज, पुणे,

५) अनिकेत अनिल वाघमारे, वय २२ वर्षे, रा. नंदनवन कॉलनी, गादीया इस्टेटजवळ, कोथरूड, पुणे यांना ताब्यात घेवुन
त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता, आरोपींनी गुन्हयाची कबुली दिलेली आहे. तसेच सदर गुन्हयातील आरोपींवर यापुर्वी देखील खुन, दरोडा, जबरी चोरी, मोटार सायकल चोरी यासारखे  मालमत्तेविरूध्दचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अटक आरोपींना मा. न्यायालयात हजर केले असता, मा. न्यायालयाने त्यांची दिनांक १०/१०/२०२३ रोजी पावेतो पोलिस कस्टडी रिमांड मंजुर केली असुन
सदर गुन्हयाचा पुढील तपास  प्रमोद क्षिरसागर, पोलिस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली  केशव वाबळे, सहा. पोलिस निरीक्षक हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही अंकित गोयल, पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण,  मितेश घट्टे, अपर पोलिस अधीक्षक पुणे,  यशवंत गवारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, शिरूर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली केशव वाबळे, सहा. पोलिस निरीक्षक  नितीन अतकरे, सहा. पोलिस निरीक्षक,  सोमनाथ कचरे, पोलिस उपनिरीक्षक यांचेसह सफौ जितेंद्र पानसरे, पोहवा शंकर साळुंके, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, पोना  विकास पाटील, कृष्णा व्यवहारे, रोहीदास पारखे,शिवाजी चितारे, पोशि  जयराज देवकर, किशोर शिवणकर, निखील रावडे यांचे पथकाने केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!