
रायगड पोलिसांनी पुन्हा एकदा उध्वस्त केला अंमली पदार्थाचा साठा,मोठ्या प्रमाणात MD ड्रगचा साठा केला जप्त…
रायगड पोलिसांची पुन्हा धडक कारवाई, २१८ कोटींचे ड्रग्स केले जप्त…
रायगड – सवीस्तर व्रुत्त असे की, खोपोली पोलिस ठाणे हद्दीतील मौजे ढेकु गावचे हद्दीत मात्र अंचल केमिकल या नावाने केमिकल बनवण्याचा व्यवसाय करणा-या कंपनीमध्ये प्रतिबंधीत केलेले अंमली पदार्थ (ड्रग्स) बेकायदेशीरपणे तयार केले जात असल्याच्या माहीतीवरुन खोपोली पोलिसांनी छापा मारुन केलेल्या कारवाईनुसार खोपोली पोलिस ठाणे गुन्हा रजि.क्र. ३६४/२०२३ गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (C), २२ (C) सह कलम २९ प्रमाणे (दि.०८ डिसेंबर) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर कारवाईच्या वेळी पोलीसांनी १०७ कोटी ३० लाख ३७ हजार ३७७ रुपये किंमतीचे (MD Drug) अंमली पदार्थ तसेच त्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल इ.साहीत्य जप्त केले होते. सदर गुन्ह्यात ३ आरोपींना अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, खालापुर यांनी (दि.१४डिसेंबर) पर्यंत पोलिस कोठडी मंजुर केली.



सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान अटक आरोपी ॲन्थोनी पाऊलोस करीकुट्टीकरण याने खोपोली पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील मौजे होनाड गाव, ता. खालापुर येथे एका गोडावुन मध्ये लपवुन ठेवलेला एकुण ७ बॅरेलमधील एकुण १७४.५ किलो वजनाचा रु.२१८ कोटी १२ लाख ५० हजार रुपये किंमतीचे MD म्हणजेच मेफेड्रॉन अंमली पदार्थ हे (दि.१० डिसेंबर) रोजी जप्त केले आहेत. तसेच गुन्ह्यातील अटक आरोपींनी काही अंमली पदार्थ हे परदेशात पाठवलेले असल्याची माहीती प्राप्त झाली असुन त्याबाबत अधिक तपास सुरु आहे.

अशा प्रकारे सदरची कारवाई प्रविण पवार, विशेष पोलिस महानिरीक्षक, कोकण परीक्षेत्र, सोमनाथ घार्गे, पोलिस अधिक्षक, रायगड, अतुल झेंडे, अपर पोलिस अधिक्षक, रायगड यांचे मार्गदर्शनाखाली विक्रम कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी, खालापुर यांच्या नेतृत्वाखाली गुन्ह्याचे तपास अधिकारी वरीष्ठ पोलिस निरीक्षक शितल राऊत, सहा.पोलिस निरीक्षक हरेश काळसेकर, पोलिस उप निरीक्षक सुधाकर लहाने, अभिजीत व्हरांबळे, पोहवा सागर शेवते, प्रसाद पाटील, प्रशांत पाटील, प्रदीप कुंभार, संतोष रुपनवर, नापोशि लिंबाजी शेंडगे, सतीश बांगर, प्रवीण भालेराव, पोशि प्रदीप खरात यांनी केलेली आहे.


