रायगड स्थानिक गुन्हे शाखेने केले लाखोंचे अंमली पदार्थ जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

रायगड– सवीस्तर व्रुत्त असे की रोहा-कोलाड रस्त्यावर असणा-या मराठा पॅलेस हॉटेलजवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा
रायगडच्या पथकाने अंमली पदार्थ जप्त करीत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. रोहा तालुक्यातील रोहा – कोलाड रस्त्यावरील मराठा पॅलेस हॉटेलजवळ एक इसम अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खबऱ्यां मार्फत स्थानिक गुन्हे अन्वेषण
शाखेच्या पथकाला प्राप्त झाली होती. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, तसेच पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे  शाखा, यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे  शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश कदम, सहाय्यक फौजदार दिपक मोरे, पोहवा/विकास खैरनार, पोहवा/रुपेश निगडे,पोहवा/सुदीप पहेलकर, पोशि/अक्षय जगताप, पोशि/ स्वामी गावंड, पोशि/ओमकार सोंडकर या पथकाने गोपनीय माहितीचे आधारे सापळा रचून कारवाई केली असता एकूण
5,34,000/-रुपये किंमतीचा चरस अंमली पदार्थ एकूण 1068 ग्रॅम वजनाचा प्रति ग्रॅम 500/- रुपये प्रमाणे जप्त केले आहे. यावेळी आरोपी

1) देवेंद्र जयदास पाटील वय 26 वर्ष,
2 ) भारत आत्माराम पालेकर वय-30 वर्ष दोन्ही रा. जीवनाबंदर, श्रीवर्धन, ता. श्रीवर्धन,जि.रायगड यांना अटक केली आहे.
याप्रकरणी कोलाड पोलिस ठाणे गु.र.नं. 91/2023 एनडीपीएस कायदा 1985 चे कलम 8 (क), 20 (ब), II (क) अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि/श्री.अजित साबळे हे करीत आहेत.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!